या फोटोंमागचं सत्य कळल्यास हादरून जाल! फसवणुकीचा नवा प्रकार
डिजिटल फ्रॉड किंवा सायबर फसवणुकीच्या अशा घटनांपासून सावध राहण्यासाठी तुम्हाला आणखी एका तांत्रिक गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे लोकांचे जीवन सोपे झाले आहे. तर गुन्हेगारांची गुन्हेगारी करण्याची पद्धतदेखील हायटेक झाली आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात हल्ली लोकांना सुंदर मुलींचे व्हिडिओ कॉल येत आहेत. व्हिडिओ कॉलदरम्यान मुली स्क्रीनवर अश्लील कृत्य करताना दिसतात. त्याचप्रमाणे लोकांची फसवणूक होते, प्रेमळ गोष्टी केल्या जातात आणि लोकांना फसवणुकीला बळी पाडले जाते. आता डिजिटल फ्रॉड किंवा सायबर फसवणुकीच्या अशा घटनांपासून सावध राहण्यासाठी तुम्हाला आणखी एका तांत्रिक गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे.
सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मुली कशा प्रकारे पार्टी करताना दिसत आहेत. फोटो पाहून असं वाटेल की पार्टी करणाऱ्या मुली खूप सुंदर आहेत. पण हा एक प्रकारचा फसवणुकीचा प्रकार आहे.
हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आलेले हे फोटो आपल्या प्रोफाईल पिक्चरला लावून कोणीही तुम्हाला फेसबुक किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकते. तुम्हाला असे फोटोज सुद्धा पाठवले जाऊ शकतात.
ट्विटरवर @mileszim नावाच्या एका युजरने हे फोटो शेअर केले आहेत. यापैकी एकही फोटो ओरिजिनल नसून हे सर्व एआयच्या मदतीने बनवण्यात आले आहेत, असे कॅप्शन दिले आहे.
Midjourney is getting crazy powerful—none of these are real photos, and none of the people in them exist. pic.twitter.com/XXV6RUrrAv
— Miles (@mileszim) January 13, 2023
आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जाण असणारे लोक जगभरात आपल्या टॅलेंटचा जल्लोष करत आहेत. आज योग्य वेळी मागणीनुसार चित्रे बनवणारे कलाकार आहेत, त्यामुळे अनेकांना हे फोटो अगदी रिअल वाटत आहेत. त्याचबरोबर या फोटोंवर लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.