पतली कमरिया मोरी… हाय हाय हाय! स्टंट मारताना झाला पचका
आजकाल बुलेट बाइकवर रील बनवण्याची क्रेझ आहे. पण या बाइकसोबत स्टंट करणाऱ्या प्रत्येकालाच यश मिळतंच असं नाही.
पतली कमरिया मोरी… हाय हाय! आजकाल लोक या ट्रेंडिंग गाण्यावर खूप रील बनवत आहेत. जो हे भोजपुरी गाणं पाहतो तो कायम गुणगुणत असतो. इंटरनेटवर रोज व्हायरल होत असलेल्या या गाण्यावर अनेक रील तयार करण्यात आली आहेत. लग्न समारंभ आणि वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्येही हे गाणं खूप ऐकायला मिळतंय. यावर अनेक आश्चर्यजनक आणि मजेशीर रील तयार करण्यात आली आहेत. हल्ली या गाण्यावर बनवलेली एक रील लोकांमध्ये व्हायरल होत आहे.
आजकाल बुलेट बाइकवर रील बनवण्याची क्रेझ आहे. पण या बाइकसोबत स्टंट करणाऱ्या प्रत्येकालाच यश मिळतंच असं नाही. काही वेळा लोकांचा चांगलाच पचका होतो. असाच एक व्हिडिओ आजकाल पाहायला मिळाला जिथे एक मुलगी बुलेटवर बसून पतली कमरिया या गाण्यावर नाचू लागते, पण या दरम्यान तिचा असा पचका होतो की पुढच्या वेळी स्टंट करण्याआधी ती शंभर वेळा विचार करेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी आपल्या बुलेटवर बसली आहे आणि काहीही विचार न करता पेट्रोलची टाकी उघडते आणि त्याचा वास घेऊ लागते.
View this post on Instagram
त्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये वाजणारी गाणी म्हणजे पतली कमरिया मोरी… हाय।।। हाय! पण ती कंबर हलवायला जाई आणि तिचा तोल जातो. ती मुलगी सरळ खाली पडते आणि टाकीतून पेट्रोलही जमिनीवर सांडते.
हा व्हिडिओ @upendrakuma नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. चार लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओ पाहिलाय.