अवघ्या काही सेकंदात दुकानातून 7 लाख लंपास केले, लुटमारीचा थरारक व्हीडिओ व्हायरल

Robbery in Patna | या दरोडेखोरांच्या हातात बंदुका होत्या. बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना जागेवर बसवले. त्यानंतर टेबलावर मोजण्यासाठी ठेवलेल्या पैशांची काही बंडलं घेऊन हे दरोडेखोर तातडीने पसार झाले.

अवघ्या काही सेकंदात दुकानातून 7 लाख लंपास केले, लुटमारीचा थरारक व्हीडिओ व्हायरल
पाटण दरोडा
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 12:18 PM

पाटणा: बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या एका लुटमारीच्या घटनेचा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत दरोडेखोरांनी अवघ्या काही सेकंदांमध्ये दुकानातून लाखो रुपये लंपास केल्याचे दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा व्हीडिओ पाटण्यातील हारिज बाजार परिसरातील आहे.

याठिकाणी आंगडियाचा व्यवसाय चालणाऱ्या दुकानाला दरोडेखोरांनी लक्ष्य केले. दुकानातील तीन कर्मचारी पैसे मोजण्याचे काम करत होते. त्यावेळी सशस्त्र दरोडेखोर अचानाक आतमध्ये शिरले. या दरोडेखोरांच्या हातात बंदुका होत्या. बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना जागेवर बसवले. त्यानंतर टेबलावर मोजण्यासाठी ठेवलेल्या पैशांची काही बंडलं घेऊन हे दरोडेखोर तातडीने पसार झाले.

या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता दरोडेखोरांनी तब्बल सात लाख रुपयांची नोटेची बंडलं उचलून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. दुकानातील कर्मचारी दरोडेखोरांना प्रतिकार करु शकले नाहीत. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना धमकावले आणि अवघ्या काही सेकंदात हाताला लागतील तेवढे पैसे घेऊन दरोडेखोर पसारही झाले. या घटनेमुळे पाटण्यात मोठी खळबळ माजली आहे.

हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस दरोडेखोरांची शोध घेत आहेत. परंतु, अद्याप दरोडेखोरांचा तपास लागलेला नाही.

इतर बातम्या:

चारित्र्यावर संशय, पत्नीचं गुप्तांग सुई-दोऱ्याने शिवलं, ‘सर्किट’ पतीच्या विकृतीचा कळस

पठ्ठ्याने PUBG नादात आईच्या खात्यातून 10 लाख उडवले, नंतर चिठ्ठी लिहून म्हणतो मी घरीच येणार नाही

गोडाऊनमध्ये लाखो रुपयांची रोकड ठेऊन चावी गुप्त ठिकाणी, त्यानंतरही मालाडच्या कुरिअर कंपनीत चोरी, नेमकं काय घडलं

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.