इथे असतो मुला-मुलींचा विचित्र मेळावा, पान खायला देताच ठरतं लग्न!
योग्य, मनासारखा जोडीदार शोधणे ही त्यात प्रामुख्याने येणारी गोष्ट. कधी जोडीदार ऑनलाइन शोधला जातो, कधी घरच्यांच्या ओळखीने घरचेच आपल्यासाठी जोडीदार शोधतात. ज्यांचं लग्न लवकर होत नाही ते मात्र या सगळ्याला कंटाळलेले असतात. लग्नाला घेऊन भारतात अशा अनेक प्रथा परंपरा आहेत.
पटना: आजकाल लग्न म्हटलं की अनेक गोष्टी येतात. योग्य, मनासारखा जोडीदार शोधणे ही त्यात प्रामुख्याने येणारी गोष्ट. कधी जोडीदार ऑनलाइन शोधला जातो, कधी घरच्यांच्या ओळखीने घरचेच आपल्यासाठी जोडीदार शोधतात. ज्यांचं लग्न लवकर होत नाही ते मात्र या सगळ्याला कंटाळलेले असतात. लग्नाला घेऊन भारतात अशा अनेक प्रथा परंपरा आहेत. एक परंपरा अशीच बिहार मध्ये आहे. देशभरात लग्नाबाबत एक विचित्र परंपरा पाळली जाते, पण तुम्हाला माहित आहे का की बिहारच्या पूर्णियामध्ये एक जत्रा आहे, जिथे मुलं आपल्या आवडीची मुलगी निवडू शकतात. या जत्रेला पट्टा मेळा म्हणून ओळखले जाते आणि इथे मुले आपल्या आवडीच्या मुलीला पान देऊन लग्नासाठी प्रपोज करतात.
दीडशे वर्षांहून अधिक जुनी परंपरा
बिहारमधील पूर्णिया मधील बनमनखी उपविभागातील मलियानिया दियारा गावात असलेल्या जत्रेचा इतिहास १५० वर्षांहून अधिक जुना आहे. अविवाहित मुला-मुलींना या पारंपारिक जत्रेत खूप रस असतो आणि बिहारव्यतिरिक्त पश्चिम बंगाल, झारखंड आणि नेपाळमधूनही लोक इथे येतात.
आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे
दरवर्षी एप्रिल महिन्यात भरणारा हा मेळावा प्रामुख्याने आदिवासींकडून आयोजित केला जातो. त्यापर्यंत पोहोचणाऱ्या मुला-मुलींना आपल्या आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य असते. जत्रेत येणारी मुलं आपल्या आवडीच्या मुलीला पान देऊन लग्नासाठी प्रपोज करतात आणि मुलगी पान खात असेल तर याचा अर्थ तीही त्या मुलावर प्रेम करते.
जर मुलगी पान खात असेल तर…
जत्रेत मुलाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर मुलगी घरच्यांच्या संमतीने मुलासोबत जाते. यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत लवकरच आदिवासी रीतीरिवाजानुसार मुला-मुलीचे लग्न केले जाते. जत्रेच्या आयोजकांपैकी एक आणि माजी सरपंच म्हणतात की, जत्रेत येणाऱ्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर तिला प्रपोज करण्यासाठी तो पान खाण्याची ऑफर देतो. जर मुलगी पान खात असेल तर याचा अर्थ असा होतो की ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे आणि जर ती खात नसेल तर याचा अर्थ तिला त्या मुलाशी लग्न करायचे नाही.
लग्न ठरविल्यानंतर लग्नास नकार देणे दंडनीय
माजी सरपंच म्हणतात की त्यांनी आतापर्यंत आपल्या आयुष्यात अनेक अशा मुला-मुलींना पाहिले आहे ज्यांनी प्रेम व्यक्त करून लग्न गाठ बांधली आहे. लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांना एक अट मान्य करावी लागते आणि त्यानुसार आदिवासी परंपरेनुसार त्यांचे लग्न केले जाते. हे लग्न करताना निसर्गाला आपले आराध्य दैवत मानले जाते.जर जत्रेत आवडल्यानंतर कोणी लग्नास नकार दिला तर त्याला आदिवासी समाजाच्या कायद्यानुसार शिक्षा होते.