Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनेक पदव्या, 13 पुस्तके लिहिली… क्लासमध्येच आपल्या विद्यार्थ्यासोबत लग्न करणाऱ्या प्रोफेसरची कहानी

Viral News: एका फ्रेशर्स पार्टीमधील विद्यार्थ्याच्या नाटकाची क्लिपिंग आहे. जी मुद्दाम व्हायरल करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील लाईव्ह व्हिडिओमध्ये पायल बॅनर्जी यांनी हात जोडून हा व्हिडिओ जास्त शेअर करू नका, अशी विनंती केली आहे.

अनेक पदव्या, 13 पुस्तके लिहिली... क्लासमध्येच आपल्या विद्यार्थ्यासोबत लग्न करणाऱ्या प्रोफेसरची कहानी
पायल बॅनर्जी
Follow us
| Updated on: Feb 07, 2025 | 8:31 PM

पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील हरिणघाट येथील मौलाना अबुल कलाम आझाद विद्यापीठातील प्रोफेसर पायल बनर्जी सध्या चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वर्गात त्यांनी विद्यार्थ्यासोबत लग्न केले. वर्गात विद्यार्थ्याने त्यांना वरमाला घातली. मांगमध्ये सिंदूर भरले. या प्रकरणानंतर सर्वत्र टीका होऊ लागली आहे. परंतु प्रोफेसर पायल बनर्जी यांची शैक्षणिक प्रगती पाहून आणि त्यानंतर त्यांनी केलेला प्रकार पाहिल्यावर सर्वांना धक्का बसत आहे.

एडम्स विद्यापीठातून पीएचडी

प्रोफेसर पायल बनर्जी मौलाना अबुल कलाम आझाद विद्यापीठात मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांच्याकडे अनेक पदव्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे त्यांनी अनेक संशोधन पेपर दिले आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगढमधून पदवी घेतली आहे. त्यानंतर गुरु नानक देव विद्यापीठातून पोस्ट ग्रेज्युएशन केले आहे. कोलकत्ता विद्यापीठातून पोस्ट पीजी डिप्लोमा केला आहे. एडम्स विद्यापीठातून मानसशास्त्रात पीएचडी केली आहे.

13 पुस्तके, अनेक शोधप्रबंध

प्रोफेसर पायल बॅनर्जी यांनी 13 पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे 14 शोधनिबंध यूजीसीमध्ये जमा आहेत. 2009-10 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे सायकोलॉजिस्ट इंटर्न म्हणून सहा महिने एका कंपनीत बाइकर इंडस्ट्रियालिस्ट काउन्सिलर म्हणून काम केले. ऑक्टोबर 2022 पासून त्या मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

हे सुद्धा वाचा

पायल बॅनर्जी यांना अनेक पुरस्कार

प्रोफेसर पायल बॅनर्जी यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना यंग अचिव्हर अवॉर्ड, रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड मिळाले आहेत. त्या इंडियन स्कूल सायकॉलॉजी असोसिएशन आणि इंडियन सायन्स काँग्रेसच्या सदस्य आहेत. लग्नानंतर झालेल्या टीकेबाबत प्रोफेसर पायल बॅनर्जी सोशल मीडियावर लाइव्ह आल्या. त्यात त्या स्वतःबद्दल खूप काही बोलल्या.

व्हिडिओ व्हायरल करु नका…

पायल बॅनर्जी यांनी या लग्नाला नाटक असल्याचे म्हटले आहे. त्यांना विद्यापीठाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांनी सांगितले की, ही एका फ्रेशर्स पार्टीमधील विद्यार्थ्याच्या नाटकाची क्लिपिंग आहे. जी मुद्दाम व्हायरल करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील लाईव्ह व्हिडिओमध्ये पायल बॅनर्जी यांनी हात जोडून हा व्हिडिओ जास्त शेअर करू नका, अशी विनंती केली आहे.

हे ही वाचा…

महिला प्रोफेसरने विद्यार्थ्यास दिले ‘दिल’, वर्गातच केला विवाह, लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती
जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती.
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण.
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य.
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप.
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्.
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO.
मास्टरमाईंड मुंडेंच्या जवळचा असल्याने.., फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
मास्टरमाईंड मुंडेंच्या जवळचा असल्याने.., फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका.
मुंडे समर्थक राजीनाम्यानंतर नाराज, '...त्याची शिक्षा साहेबांना का?'
मुंडे समर्थक राजीनाम्यानंतर नाराज, '...त्याची शिक्षा साहेबांना का?'.
राजीनाम्यासाठी मुंडेंना धमकी? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
राजीनाम्यासाठी मुंडेंना धमकी? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची हकालपट्टी करा
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची हकालपट्टी करा.