Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मोराच्या अंत्ययात्रेला आला दुसरा मोर, इमोशनल व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओत एक मोर दुसऱ्या मोराच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video : मोराच्या अंत्ययात्रेला आला दुसरा मोर, इमोशनल व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 10:10 PM

आपल्या जवळच्या कुणालाही निरोप देणे प्रत्येकासाठी जड जातं, मैत्री कशी निभावावी याचे उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ, या व्हिडिओत एक मोर दुसऱ्या मोराच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बराच काळ सोबत राहिल्यानंतर आपल्या साथीदाराला निरोप देणे या मोरासाठीही कठिण होऊन बसले आहे, त्यामुळेच तो शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या सोबत आहे.

शेवटच्या वाटेवरही सोबत

सोशल मीडियावर व्हायरल होणारा मोराचा हा व्हिडिओ पाहून लोकही त्यांच्या भावना व्यक्त करत आहे. मोराचा मृत्यू झाल्यानतंर दोन लोक त्याला घेऊन जाताना या व्हिडिओत दिसून येत आहे, तर या मोराचा साथीदारही या लोकांच्या मागे जाताना दिसून येत आहे. इतरवेळी मोर माणसांपासून लांब पळतात, मात्र यावेळी हा मोर निडर होऊन त्याच्या मित्राला निरोप द्यायला पोहोचला आहे, नुसता पोहोचलाच नाही, तर तो शेवच्या प्रवासातही त्याच्यासोबत चालतोय.

नेटकरीही हा व्हिडिओ पाहून थक्का झाले आहेत. व्हिडिओ @Bishnoiofficiai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. साथीदार साथ सोडून स्वर्गात निघाला. त्याच्या अंत्ययात्रेत सोबत जाताना राष्ट्रीय पक्षी मोर. पक्षी असतानाही मित्राच्या दूर जाण्याचं इतकं दुःख, हे दृश्य पाहून कोणीही भावुक होईल. अशी पोस्ट या अकाऊंटवरून करण्यात आली आहे, हा व्हिडिओ आतापर्यंत हजोरो लोकांनी पाहून त्यावर रिअॅक्सन दिल्या आहे. अनेकांनी या व्हिडिओवर इमोशनल कमेंट केल्या आहेत, तर कित्येक लोकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.

VIDEO : पहिल्या सेकंदात वाटला छाटछुट स्टंट, व्हिडिओ पुढे सरकला अन् पोटात गोळाच उठला, काय हा जीवघेणा प्रकार?, पाहा व्हिडीओ!

VIDEO : देव तारी त्यास कोण मारी! तीन वाहनांमध्ये भयानक अपघात… मात्र, पुढे असे काही घडले की, पाहुण प्रत्येकजण झाला आश्चर्यचकित

VIDEO : लग्नामध्ये नवरीची धडाकेबाज एन्ट्री, वऱ्हाडी मंडळी आश्चर्याने पहातच राहिले…पाहा व्हायरल व्हिडिओ!