अरे वाह! तुम्ही 90 च्या दशकातील असाल तर तुम्हाला हे बघून काहीतरी आठवेल…

जर तुम्ही 90 च्या दशकातील असाल आणि अशा काळात मोठे झाला असाल जेव्हा तंत्रज्ञान इतकं हायफाय नव्हतं, तर तुम्ही स्वत:ला खूप युनिक समजू शकता. असे मानले जाते की, 90 च्या दशकात गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या नव्हत्या आणि गोष्टी अगदी सोप्या असायच्या. सध्या सोशल मीडियाने आयुष्याची पार वाट लावून टाकली, आत्ताच्या लहान मुलांना काय माहित कार्टून नेटवर्क […]

अरे वाह! तुम्ही 90 च्या दशकातील असाल तर तुम्हाला हे बघून काहीतरी आठवेल...
Cartoon NetworkImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 3:57 PM

जर तुम्ही 90 च्या दशकातील असाल आणि अशा काळात मोठे झाला असाल जेव्हा तंत्रज्ञान इतकं हायफाय नव्हतं, तर तुम्ही स्वत:ला खूप युनिक समजू शकता. असे मानले जाते की, 90 च्या दशकात गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या नव्हत्या आणि गोष्टी अगदी सोप्या असायच्या. सध्या सोशल मीडियाने आयुष्याची पार वाट लावून टाकली, आत्ताच्या लहान मुलांना काय माहित कार्टून नेटवर्क काय होतं, पोगो काय होतं. त्यांना फक्त फोन कळतो, फोन घेऊन बसायचं त्यावरच लोकांशी बोलायचं अशी ही आत्ताच्या मुलांची जीवनशैली. पण त्यावेळी तसं नव्हतं. मनोरंजनासाठी लोक टीव्हीसमोर बसायचे आणि आपल्या आवडीच्या गोष्टी बघण्यासाठी आपलं दिवसाचं वेळापत्रक पण तसं सेट करायचे.

टीव्हीवर आवडीच्या गोष्टी पाहायच्या असतील तर सकाळपासून एक प्लॅन बनवावा लागायचा, कारण आधी रोजच्या वर्तमानपत्रात टीव्हीवर कोणता कार्यक्रम येणार आहे, हे सांगितलं जायचं.

खासकरून कार्टून्स पाहण्याची आवड असणाऱ्या मुलांसाठी. आजच्याप्रमाणे ते व्हॉट्सॲप, DM किंवा मेसेज करण्याऐवजी एकमेकांशी बोलायचे.

आता डॉ. अजयता यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे त्या काळाची झलक पाहायला मिळाली, जी बघून तुम्हाला नॉस्टॅल्जिया होईल. पोस्टमध्ये टीव्ही शोची संपूर्ण यादी आहे जी आपल्याला आपल्या पूर्वीच्या दिवसाची आठवण करून देऊ शकते.

आताच्या पिढीला कदाचित याकडे एक प्रकारचे प्राचीन हस्तलिखित म्हणून पाहिले जाऊ शकते. या शोच्या लिस्टिंगमध्ये ‘टॉम अँड जेरी’, ‘डेक्सटर’, ‘पॉवरपफ गर्ल्स’, ‘स्कूबी डू’ अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

या पोस्टला चार हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. आपल्या सोनेरी आठवणी शेअर करण्यासाठी लोकांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही यादी कशी आठवली आणि कार्टून नेटवर्क मॅरेथॉन कशी केली याबद्दल अनेकांनी लिहिले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.