या गावात कपडे घालण्यास बंदी! गावात पब, जलतरण तलाव…

इथे ज्या समुदायाचा उल्लेख केला जात आहे तो खूप सुशिक्षित आहे आणि हे गाव बरेच प्रगत आहे.

या गावात कपडे घालण्यास बंदी! गावात पब, जलतरण तलाव...
people live without clothesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 5:08 PM

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. यातील एखादी गोष्ट काढली तर आयुष्याची कल्पना करणे थोडे कठीण जाते. ही बातमी माणसांच्या कपड्यांसंदर्भात आहे. कोणत्याही देशाचा पेहराव हा थेट त्या देशाच्या संस्कृतीशी निगडित असतो. संपूर्ण जगात कपडे घालणारे मानव हे एकमेव प्राणी आहेत, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजही पृथ्वीवर असे अनेक समुदाय आहेत जे कपडे घालत नाहीत. अनेक आदिवासी समाज वेषभूषा करत नाहीत परंतु आदिवासी समाज सहसा मुख्य प्रवाहापासून स्वत:ला दूर ठेवतात. इथे ज्या समुदायाचा उल्लेख केला जात आहे तो खूप सुशिक्षित आहे आणि हे गाव बरेच प्रगत आहे.

ब्रिटनमध्ये स्पिलप्लाट्झ नावाचे एक गाव आहे, जिथे लोकांनी जवळजवळ 94 वर्षे कपड्यांशिवाय राहणे पसंत केले आहे. हे गाव हर्टफोर्डशायरमधील ब्रिकेटवूडपासून जवळ आहे.

इथे स्त्री-पुरुषांना सर्वांना नग्न राहावं लागतं. इथे एक खास गोष्ट म्हणजे इथे फिरायला येणाऱ्यांनाही असंच जगावं लागतं. स्पिलप्लाट्झच्या लोकांची जीवनशैली खूप प्रगत आहे. कारण गावात स्वत: चे पब, जलतरण तलाव आणि इतर अनेक सुविधा आहेत.

हे गाव वसवण्याचे श्रेय इस्ल्ट रिचर्डसन यांना जाते. रिचर्डसन यांनी 1929 साली याची स्थापना केली. थंडीच्या काळात इथे कपडे न घालण्याचे स्वातंत्र्य आहे.

हे गाव वसविणाऱ्या इस्ल्ट रिचर्डसचा असा विश्वास होता की, निसर्गाच्या जवळ राहावे लागत असल्यामुळे त्याला शहराच्या गोंगाटापासून दूर जायचे होते. अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे गावातील लोक स्वत:ला निसर्गाच्या जवळचं समजतात.

या गावाचा पाया रचला गेला तेव्हा त्याला प्रचंड विरोध झाला, पण जगण्याच्या हक्कामुळे सर्व आंदोलने थांबवावी लागली. विशेष म्हणजे भारतातील अंदमान बेटावर राहणारी ‘जारवा’ आदिवासी जमातही कपड्यांशिवाय आयुष्य घालवते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.