‘आम्हाला नवा भारत नको’, सोशल मीडियावर #NoMoreModi ट्रेंडिंगवर, वाढत्या कोरोनामुळे लोक भडकले
वाढत्या कोरोनामुळे मागील काही दिवसांपसून ट्विटर, फेसबूकसारख्या माध्यमांवर केंद्र सरकारविरोधी मतं मांडली जातायत. (narendra modi corona patients)
मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज लाखो रुग्ण वाढतायत. मृतांचा आकड्यांमध्येसुद्धा वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांमुळे देशात आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. शनिवारी (8 मे) आतापर्यंत सर्वात जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याचाच राग आता समाजमाध्यमांवर काढला जातोय. सोशल मीडियावर लोक केंद्र सरकारला जाहीरपणे धारेवर धरतायत. मागील काही दिवसांपसून ट्विटर, फेसबूकसारख्या माध्यमांवर केंद्र सरकारविरोधी मतं मांडली जातायत. सध्या तर (9 मे रोजी) #NoMoreModi हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर असून केंद्राच्या कोरोनाविषयक धोरणावर टीका केली जातेय. (people on social media demands resignation of Narendra Modi amid increase in Corona patients and Mortality rate)
ट्विटरवर #NoMoreModi ट्रेंडिंगवर
देशात आरोग्य व्यवस्था ढासाळल्यामुळे हाहा:कार उडाला आहे. ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकांनी तडफडून प्राण सोडले आहेत. तसे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा झालेयत. काही व्हिडीओमध्ये रुग्णाचे नातेवाईक ऑक्सिजनसाठी, बेडसाठी धावपळ करताना दिसून आलेले आहेत. याच गोष्टीमुळे ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात लोक आपली मतं मांडतायत. #NoMoreModi हा हॅशटॅक सध्या ट्विटरवर ट्रेंडिंगवर आहे. #NoMoreModi या हॅशटॅगखाली नेटकऱ्यांनी आम्हाला तुमचा नवा भारत नकोय. त्याला आमच्यापासून दूर ठेवा अस म्हटलंय. तर कहींनी लॅन्सेट या जागतिक दर्जाच्या मासिकाचा संदर्भ देत केंद्र सरकारच्या कोरोना हाताळण्याचा कारभारावर टीका केलीये. तर काहींनी भारत देश हा कोरोनाचे केंद्रस्थान झाले असून, मोदींचे आभार असे उपहासात्मक म्हटले आहे.
ट्विटरवर ट्विट करणयात आलेले काही ट्विट्स :
Only two people can save India right now ;
1) PM : By resigning
2) President : By accepting his resignation letter.
“India Demand Resignation From PM Modi ” #NoMoreModi pic.twitter.com/wRWDcufKJK
— AVIR (@AvirWithINC) May 9, 2021
We don’t want your new India keep it away from us. #NoMoreModi #मोदी_इस्तीफा_दो pic.twitter.com/FFyZgYzL74
— Preeti Chaudhary (@HryTweet_) May 9, 2021
India needs a PM, not a campaign manager! #NoMoreModi pic.twitter.com/9LeZpPyDbz
— Dilsedesh (@Dilsedesh) May 9, 2021
This article clearly described how the administration failed and the immediate steps to be taken to overcome this Pandemic. ? #NoMoreModi pic.twitter.com/qrHXJrl05C
— Feroz Raja (@indianraaja) May 9, 2021
#NoMoreModi India’s biggest non performing Asset. pic.twitter.com/ksUgCR7nx7
— Truth@Honest✋ (@Thecongressian) May 9, 2021
केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन
दरम्यान, केंद्र सरकार कोरोनाविरोधी लढा लढताना सपशेल अपयशी झाल्याचा आरोप होत असला तरी केंद्र सरकारने हा लढा नेटाने लढल्याचा दावासुद्धा काही नेटकऱ्यांकडून होतोय. केंद्र सरकारच्या चांगल्या कामगिरीमुळेच सध्या मृत्युसंख्या आटोक्यात असल्याचे काहींनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारला जमेल त्या मार्गाने पाठिंबा देणे आपले कर्तव्य असल्याचेसुद्धा सोशल मिडीयावर म्हटले जातेय.
इतर बातम्या :
Video | घरासमोर येताच आकाश उजळलं, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, नव्या नवरीची ‘रॉयल एन्ट्री’ पाहाच
(people on social media demands resignation of Narendra Modi amid increase in Corona patients and Mortality rate)