प्रत्येकजण कसा ओलाचिंब झाला! रेल्वे स्टेशनची कृपा
या वेळी अचानक एक गाडी प्लॅटफॉर्मवरून जाते. आता रेल्वेच्या आत असणाऱ्याला याबाबत काहीच कल्पना नाही.
रेल्वे स्टेशन! लोक जेव्हा इथून एखादा व्हिडिओ पोस्ट करतात, तेव्हा ते खूप मनोरंजक असतात. प्रवाशांच्या मदतीसाठी धावतानाची कथा असो किंवा स्टेशनवरच्या सर्व घडामोडींचे व्हिडिओ असोत, जेव्हा जेव्हा युजर्स इंटरनेटवर रेल्वे संबंधित व्हिडीओ शेअर करतात तेव्हा लगेच व्हायरल होतात. आता रेल्वे स्टेशनवरून आणखी एक व्हिडिओ समोर आला. लोक तो व्हिडीओ बघून हसून लोटपोट होतायत.अभय नावाच्या ट्विटर युजरने रेल्वे स्टेशनवर पाण्याचा नळ तुटल्यानंतर पाणी बाहेर पडतानाची क्लिप शेअर केली आहे.
या व्हिडिओतील सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले प्रवासी बाजूला उभे राहून स्वत:ला सावरत आहेत, मात्र प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ट्रेनच्या आत उपस्थित असलेल्या प्रवाशांसाठी ही समस्या बनलीये.
व्हिडिओत पाहू शकता, नळाचे पाणी दाबाने पूर्ण ताकदीने बाहेर येत आहे. या वेळी अचानक एक गाडी प्लॅटफॉर्मवरून जाते. आता रेल्वेच्या आत असणाऱ्याला याबाबत काहीच कल्पना नाही.
आपण पूर्ण भिजणार आहोत हेही त्याच्या डोक्यात नसेल. पण ट्रेन येते आणि पाण्याने लोक ओलेचिंब होतात.
इथे गंमत म्हणजे स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्यांमध्ये उपस्थित प्रवाशांच्या दिशेने पाणी वेगाने वाहत आहे, त्यामुळे बाकी सगळे ओले होतात.
व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘भारतीय रेल्वे आपल्या सेवेत’. या क्लिपने खूप लक्ष वेधून घेतले आहे.
Indian railways at your service ? pic.twitter.com/fEL65NFjHs
— Abhy (@craziestlazy) October 26, 2022
व्हिडीओला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या स्थानकाची नेमकी जागा माहित नसली तरी ज्या लोकांनी भाष्य केले ते अजूनही आपापले अंदाज बांधत आहेत.
काही कमेंट्स असे सूचित करतात की हे पश्चिम बंगालमधील स्थानक असू शकते.