मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या लोकांनी कथन केले आपले अनुभव
मृत्यूनंतर तुम्हाला कसे वाटते? हा एक अतिशय विचित्र प्रश्न आहे. पण प्रत्येकाला त्याचे उत्तर जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. वैद्यकीयदृष्ट्या मृत्यूनंतर जे लोक पुन्हा जिवंत झाले, त्या लोकांनी या प्रसंगाचे वर्णन केले आहे.
आपण मरतो तेव्हा आपले काय होते? हा असा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधक वर्षानुवर्षे गुंतले आहेत. जगातील सर्वोत्तम बुद्धिमान देखील या प्रश्नाचे अचूक उत्तर शोधू शकलेले नाहीत. मृत्यूनंतर (After death) माणसाचे नेमके काय होते? रीसर्च वेबसाईड ‘इंडिपेन्डंट डॉट को डॉट युके’च्या मते, काही काळापूर्वी एका रेडिट थ्रेडने (Reddit thread) या प्रश्नाचे उत्तर अशा लोकांकडून घेतले होते. जे वैद्यकीयदृष्ट्या मरण पावले (Died medically) होते आणि पुन्हा जिवंत झाले होते. ज्यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली त्यांची तीन भागात विभागणी करण्यात आली. प्रथम ते ज्यांना काहीच वाटले नाही, दुसरे ते जे मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीशी बोलत होते आणि तिसरे ज्यांना फक्त प्रकाश दिसला. NYU लँगोन मेडिकल सेंटर, यूके येथील औषधशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सॅम पर्निया, यांनी हृदय बंद (कार्डियाक अटॅक) झालेल्या रुग्णांचा पाठपुरावा केला. त्यांना असे आढळले की सुमारे 40 टक्के लोक वैद्यकीयदृष्ट्या मरण पावल्यानंतरही काही प्रमाणात सचेतावस्थेत हेाते.
डोळ्यासमोर अंधार पसरला होता
एकाने सांगितले की, “माझी अँजिओग्राफी (कोरोनरी आर्टरीचा एक्स-रे) होत होती आणि मी स्क्रीनकडे बघत डॉक्टरांशी बोलत होतो. हळू हळू अलार्म वाजू लागला आणि माझ्या आजूबाजूचे लोक घाबरले. माझे जग अंधूक झाले आणि सर्व काही संपले. माझ्या डोळ्यांसमोर अंधार झाला. त्यानंतर मला एवढेच आठवते की माझे डोळे उघडे होते आणि आम्ही त्याला वाचवले असे डॉक्टर बोलत होते. ही खूप आनंद देणारी भावना होती.”
एका खड्ड्यातून मी, खाली पडत होतो.
दुसऱ्या एकाने सांगितले की, “मी एकदा वर्गात सादरीकरणादरम्यान पडलो. माझा श्वासोच्छ्वास थांबला आणि रक्ताभिसरण थांबले. मला असे वाटले की, मी एका खड्ड्यातून खाली पडलो आहे आणि माझे मित्र मदतीसाठी आले. मृत्यूच्या तोंडातून जिवंत परतल्यानंतर काहीही आठवत नाही. जणू काही मी निवांत झोपून होतो”
दिव्यांच्या भिंतीसमोर उभा होतो
एकाने सांगितले की, “फेब्रुवारी 2014 मध्ये ऑफिसच्या मिटींग दरम्यान मी खाली पडलो आणि माझ्या हृदयाचे ठोके आणि नाडी पाच मिनिटांसाठी थांबली. मला शेवटचे आठवते तो काळ (स्मृती) खाली पडण्याच्या एक तास आधीची होती आणि माझी पुढची आठवण दोन दिवसांनंतरची होती. दरम्यान मी सर्व काही विसरलो होतो. मी, वैद्यकीयदृष्ट्या कोमात होतो. मी 40 सेकंदांसाठी सर्वकाही विसरले होतो. मला सर्व काही अल्हाददायी वाटत होते.
ते पुढे म्हणाले, “मला रुग्णवाहिकेत नेले जात असतानाचा तो काळ थोडासा आठवतो. मला माझा मृतदेह रुग्णवाहिकेत दिसला. त्यानंतर माझ्यासमोर अतिशय तेजस्वी प्रकाशाची मोठी भिंत उभी होती आणि मी, समोर उभा राहिलो. मी जिकडे पाहत होतो तिथे मला फक्त दिवेच दिवे असलेली भिंत दिसत होती.त्यानंतर मला काहीच आठवत नाही.
आईने सांगितले.. मी मृत झालो होतो
मृत्यूच्या दाढेतून परतलेला व्यक्ती पुढे म्हणाला, माझ्या आजूबाजूला दाट धुके होते आणि तिथे मला माझा सर्वात खास मित्र दिसला. त्याने माझ्याशी बोलणे बंद केले होते. धुक्यातून बाहेर येताना त्याने मला सांगितले की, तोही अजून परतला नाही. मी प्रयत्न करत राहिलो तर मी पृथ्वीवर परत जाईन. त्यानंतर मी हार मानली नाही आणि मला पुन्हा माझ्या शरीरात ढकलण्यात आले. त्यानंतर मला शुद्ध आली तेव्हा माझ्या आईने मला सांगितले की मी मृत झालो होतो.