दर महिन्याला मासिक पाळी येत राहिली तरीही अचानक दिला बाळाला जन्म, प्रकरण काय? वाचा सविस्तर
या महिलेच्या दाव्यानुसान 9 महिने अगदी सामान्य जीवन जगत होती. या काळात तिची मासिक पाळीही वेळेवर येत होती आणि त्यामुळे तिला तिच्या गरदरपणाविषयी कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत.
इंग्लंडमधील बोल्टनमध्ये राहणाऱ्या एका महिलेला ती गरोदर असल्याचे 9 महिने कळालेच नाही. जेव्हा अचानक पोटात दुखू लागले त्यावेळी या कळा असल्याचे सांगितले. 9 महिने या महिलेला गरोदरपणाची कोणतीही लक्षणे नव्हती त्यामुळे अचानक ही माहिती समोर अल्याने तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. या महिलेच्या दाव्यानुसान 9 महिने अगदी सामान्य जीवन जगत होती. या काळात तिची मासिक पाळीही वेळेवर येत होती आणि त्यामुळे तिला तिच्या गरदरपणाविषयी कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत.
9 महिने गरोदरपणाची कल्पनाच नाही
मेलिसा असे या महिलेचे नाव आहे, या काळात तिने फिरायला गेल्याचेही सांगितले आहे. तिने टेनिस स्पर्धेतही भाग घेतला होता. त्याचबरोबर तिने अनेक पाण्यातील खेळातही सहभाग घेतला होता. त्यावेळीही तिला गरोदर असल्याची जराशीही जाणीव झाली नाही. त्यानंतर अचानक तिच्या पोटात जोरात दुखू लागले. पहिल्यांदा हे अपचन असल्याचे वाटले, त्यामुळे ती डॉक्टरकडे गेली. त्यावेळी डॉक्टरने या कळा असल्याचे सांगितले. त्यानंतर तिलाही धक्का बसला.
9 महिन्यांनी दिला गोंडस मुलाला जन्म
तिने सांगितले की, ज्यावेळी हे पहिल्यांदी मी डॉक्टरांच्या तोंडून ऐकले तेव्हा मलाही धक्का बसला कारण मला याची कसलीही कल्पना नव्हती. ही मला हादरवून सोडणारी माहिती होती. त्यानंतर तिला डॉक्टरांनी गोरदर चाचणी करण्यास सांगितले, गुप्त गर्भात बाळ हे पोटाच्या मागच्या बाजून असते. त्यानंतर मेलिसाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मुलाचा चेहरा पाहून मेलिसाचा आनंद द्विगुणीत झाला होता. असा एखाद्या बाळाचा जन्म होणे अगदी क्वचितच असेल.