एकटीच मुलगी रस्त्यानं चालली होती, “लोक सुधारणार नाहीत!” असंच म्हणाल
जगात असे काही विचित्र लोक आहेत, ज्यामुळे स्त्रिया एकट्याने कुठेही जाण्यास टाळाटाळ करतात. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक मुलगी निर्जन रस्त्यावर कुठेतरी एकटीच जाताना दिसत आहे, पण...
मुंबई: जगाने कितीही प्रगती केली असली तरी काही गोष्टी जशाच्या तशा असतात, ज्या आजही चर्चेचा विषय ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे महिलांची सुरक्षितता. कुठलाही देश असो, महिलांच्या सुरक्षेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. जगात असे काही विचित्र लोक आहेत, ज्यामुळे स्त्रिया एकट्याने कुठेही जाण्यास टाळाटाळ करतात. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक मुलगी निर्जन रस्त्यावर कुठेतरी एकटीच जाताना दिसत आहे, पण या दरम्यान एक व्यक्ती तिच्यावर जबरदस्ती करू लागतो. तेव्हा तिथून जाणाऱ्या बसमधील लोक तिला मदत करतात आणि त्या माणसाला बेदम मारहाण करतात.
या व्हिडिओमध्ये एक मुलगी निर्जन रस्त्यावर पाठीवर बॅग टांगून फिरताना दिसत आहे. तेवढ्यात तिच्या मागे एक माणूस धावत येतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी मुलगीही त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसते पण तो माणूस तिला सोडत नाही. दरम्यान, तिथून एक बस जात असताना ती अचानक थांबते. मग काही लोक त्या बसमधून खाली उतरतात आणि त्या माणसाला जोरदार मारहाण करतात. यानंतर ती मुलगी त्या बसमध्ये चढू लागते.
For harrassing a girl on road pic.twitter.com/TBJmwRVHAc
— CCTV IDIOTS (@cctvidiots) April 9, 2023
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @cctvidiots नावाच्या आयडीसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 38 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 6.9 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, तर 69 लाख 2 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.