कुत्र्याच्या मृत्यूनंतर घरातल्या लोकांनी असं काही केलं की बातमीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला
हा कुत्रा या लोकांना खूप प्रिय होता, पण अचानक त्या कुत्र्याचा काही आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर हे कुटुंब अत्यंत दु:खी झालं.
असे अनेक लोक आहेत ज्यांना पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. ते त्यांच्या पाळीव कुत्र्यांसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतात. दरम्यान, एका कुटुंबाने पाळीव कुत्रा पाळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.पण मेलेल्या कुत्र्याच्या आठवणीत या कुटुंबाने असं काही केलं आहे जे लोकांना अजिबात आवडलं नाही.
हा कुत्रा घरातल्या लोकांना खूप प्रिय होता. खरं तर ही घटना ऑस्ट्रेलियातील एका कुटुंबाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कुटुंबाकडे पांढऱ्या रंगाचा कुत्रा होता.
हा कुत्रा या लोकांना खूप प्रिय होता, पण अचानक त्या कुत्र्याचा काही आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर हे कुटुंब अत्यंत दु:खी झालं. या कुत्र्याला दफन करण्याऐवजी त्याची एक आठवण ठेवण्याचा या कुटूंबाने निर्णय घेतला.
त्यांनी कुत्र्याची संपूर्ण कातडी काढली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कुटुंबाने या कातडीने कार्पेट बनवून आपल्या घरात ठेवले. असे करून आपला कुत्रा आपल्याबरोबर राहील असे त्याला वाटले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओमध्ये फक्त कुत्र्याची कातडी दिसत असली तरी या कातडीचा गालिचाही बनवण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
हा व्हिडिओ पाहून लोक संतापले आहेत. लोक म्हणतात की इतके प्रेम देखील योग्य नाही कारण ही प्राण्यांविरूद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी घटना आहे.