ब्रेकअप नंतरचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय, खूप हसाल!
काही मित्र ब्रेकअपची खिल्ली उडवायला मागेपुढे पाहत नाहीत.
बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर जेव्हा ब्रेकअप होतं तेव्हा अर्थातच खूप दु:ख होतं. ब्रेकअपचं दु:ख काही जणांना इतर कुणाशीही शेअर करता येत नसलं तरी मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करता येतं. त्यांच्याशी आपण आपल्या मनातलं सगळं बोलू शकतो. खरंतर ब्रेकअप झालं की मित्र-मैत्रिणी कामी येतात, तेच दिलासा देण्याचं काम करतात. पण जितके चांगले मित्र मैत्रिणी असतात तितकेच ते खोडकर पण असतात. मजा मस्करीमध्ये कशाचं काय करून बसतील काहीच सांगता येत नाही.
काही मित्र ब्रेकअपची खिल्ली उडवायला मागेपुढे पाहत नाहीत. स्वत:च्या मित्राच्या ब्रेकअपबद्दल ते अनेकांना सांगतात आणि मग त्याची खिल्ली उडवतात.
असाच काहीसा प्रकार व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला होता, जेव्हा या मुलीने आपल्या मैत्रिणीला ब्रेकअपची बातमी सांगितली तेव्हा तिने हे सर्व फोनमध्ये रेकॉर्ड केलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वंशिका नावाच्या एका मुलीने आपल्या मित्राला फोन करून आपलं ब्रेकअप कसं झालं हे सांगायला सुरुवात केली.
या दरम्यान तिच्या मैत्रिणीने हा फोन स्पीकर वर ठेवून व्हिडिओ काढला. कॉलमध्ये तुम्ही ऐकू शकता की, मुलीचं दोन महिने रिलेशनशिप होतं, जे पुढे जाऊ शकलं नाही त्यामुळे मुलगी खूप रडत आहे. तिच्या मैत्रिणीला ती ब्रेकअप का झालं कसं झालं सांगतीये.
मैत्रिणीने काय झाले असं विचारले असता मुलीने सांगितले की, ‘आमच्या रेलशनशिपच्या दोन महिन्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी मी थ्रेडिंग, वॅक्सिंग करून घेतले. इतकी वेदना झाली की पार्लरमध्ये मी आरडाओरड केली. पण त्याचा या मुलाचा अॅटिट्यूड बघ मला तो म्हणतोय की, मला अजून खात्री नाही. मला वाटते की आपण ब्रेक घेतला पाहिजे.”
हा व्हिडिओ या मुलीच्या मैत्रिणीने रेकॉर्ड केला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर लोक खूप हसत आहेत.
probably the funniest post-breakup crying session ?? pic.twitter.com/tkac4bbgxs
— isHaHaHa (@hajarkagalwa) December 8, 2022
@hajarkagalwa नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 6.5 लाखाहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे.