Video | फोटो काढण्याच्या नादात थेट पाण्यात, फोटोग्राफरला पाहून नवरी-नवरदेव घाबरले, व्हिडीओ पाहाच

सध्या तर एक अतिशय वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये फोटोशूटदरम्यान एका फोटोग्राफरची चांगलीच फजिती उडाली आहे.

Video | फोटो काढण्याच्या नादात थेट पाण्यात, फोटोग्राफरला पाहून नवरी-नवरदेव घाबरले, व्हिडीओ पाहाच
marriage viral video
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 7:40 AM

मुंबई : सोशल मीडियावर लग्न समारंभातील वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. सध्या तर एक अतिशय वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये फोटोशूटदरम्यान एका फोटोग्राफरची चांगलीच फजिती उडाली आहे. हा सर्व प्रकार क्रॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. फोटोग्राफरची फजिती उडाल्यावर नवरी आणि नवरदेवाने दिलेले एक्स्प्रेशन हे पाहण्यासारखे आहेत. (photographer falls in swimming pool while bride and groom photo shoot in wedding ceremony video went viral on social media)

फोटोग्राफर थेट स्वीमिंग पुलामध्ये पडला

व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एक लग्नसोहळा अतिशय थाटामाटात पार पडत आहे. एक पंजाबी नवरदेव आपल्या नवरीला घेऊन पाहुण्यांमधून चालतो आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. नवरीच्या हातामध्ये एक पुष्पगुच्छ दिसत आहे. तर नवरदेवाच्या हातामध्ये भारदस्त तलावर आहे. नवरी-नवरदेव अतिशय खूश असल्याचे दिसत आहे. मात्र, याचवेळी एक विचित्र घटना घडली आहे. नवरी-नवरदेवाचे फोटो काढण्याच्या नादामध्ये फोटोग्राफर थेट स्विमिंग पुलामध्ये पडला आहे.

फोटोग्राफर पाण्यात पडल्याचे पाहून नवरी-नवरदेव घाबरले 

फोटोग्राफर स्विमिंग पुलामध्ये पडल्याचे दिसताच सगळे अवाक् झाले आहेत. नवरीने तर चक्क तोंडाला हात लाऊन आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर नवरदेवाच्या चेहऱ्यावरही काहीतरी अक्रित घडलं असल्याचे भाव आहेत. फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरसोबत अशा प्रकारे अपघात घडल्याचे पाहून नवरी-नवरदेव घाबरले आहेत. त्यांच्या या हावभावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर wishnwed या अकाऊटंवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी वाघ, अस्वल झाले, नको त्या उचापत्या चांगल्याच भोवल्या; नेमकं काय घडलं एका पाहाच !

VIDEO : जपानी पोरींचा बॉलिवूडच्या गाण्यावर हटके डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Video | लग्नविधी सुरु, नवरी-नवरदेव खूश, मध्येच नातेवाईकांनी भलताच खेळ मांडला, व्हिडीओ व्हायरल

(photographer falls in swimming pool while bride and groom photo shoot in wedding ceremony video went viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.