फुकेत विमानतळावर भारतीय गुलाबजामूनचा जलवा! प्रवाशाला अडवलं, पुढे कहरच झाला…
व्यक्तीला फुकेत एअरपोर्टवर एक अडचण आली. पण व्यक्ती भारतीय, प्रचंड हुशार! त्याला माहित होतं आपण काय केलं पाहिजे.
एअरपोर्टचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात असतात. एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्हिडीओ मधल्या व्यक्तीला फुकेत एअरपोर्टवर एक अडचण आली. पण व्यक्ती भारतीय, प्रचंड हुशार! त्याला माहित होतं आपण काय केलं पाहिजे. फुकेत विमानतळावर या व्यक्तीला गुलाबजामूनचा कॅन नेण्यास सक्त मनाई करण्यात आली. आपल्याला तर माहित आहे विमानतळाचे नियम किती कडक असतात. मग आता काय करणार तो गुलाबजामूनचा कॅन असाच फेकून तर नाही फेकून देऊ शकत. काय केलं त्याने त्या कॅनचं बघा…
हा व्हिडीओ फुकेत विमानतळाचा आहे. या व्यक्तीला सामानाच्या चेकअपच्या वेळी रोखलं गेलं. त्याला त्याच्या सामानातून गुलाबजामून चा कॅन बाजूला काढण्यास सांगितला.
कॅन पुढे नेण्यास सक्त मनाई होती. मग काय करायचं बुआ? या व्यक्तीला एक कल्पना सुचली. तो कॅन त्याने तिथेच विमानतळावरच उघडला.
तिथे असणारी सेक्युरिटी, ज्या लोकांनी त्याला हा कॅन नेण्यास मनाई केली त्या लोकांना त्याने हे गुलाबजामून वाटले. हे करत असताना त्याने हा व्हिडीओ शूट केला.
हाच व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडीओ मध्ये तो सगळ्यांना अगदी प्रेमाने आग्रह करताना दिसतोय. विमानतळावरील सेक्युरिटी सुद्धा आधी नाही नाही म्हणते पण गुलाबजामून बघून त्यांनाही काही मोह आवरत नाहीये.
View this post on Instagram
हे बघून तर आपल्याला सुद्धा गुलाबजामून खायची इच्छा होते. भारतातले लोकं कुठेही जाऊ, मिठाई म्हटलं की त्यांच्या फार जवळचा विषय. ते स्वतःही मिठाई खातील आणि दुसऱ्यालाही देतील.
हिमांशु देवगणने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.”दिवसाची चांगली सुरुवात!” असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलंय.