अचानकच हा पायलट खिडकीतून खाली डोकावला, कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल
हा व्हिडिओ साउथवेस्ट एअरलाइन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.
विमानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कधी विमानतळावर विमान उभे असतानाही मजेशीर व्हिडिओ समोर येतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका पायलटला पाहून लोक हैराण झाले होते. कारण हा पायलट विमानाच्या कॉकपिटच्या खिडकीतून बाहेर आलाय.
खरंतर, हा व्हिडिओ साउथवेस्ट एअरलाइन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. एक प्रवासी आपला फोन खाली विसरला होता आणि मग विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अशा प्रकारे मदत केली. या व्हिडिओमध्ये पायलट कॉकपिटच्या खिडकीतून बाहेर येऊन खालून काहीतरी घेताना दिसतोय.
लॉस एंजेलिसमधील लाँग बीच विमानतळावरील मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना साउथवेस्ट एअरलाइन्सशी संबंधित आहे. लॉस एंजेलिसमधील लाँग बीच विमानतळावर ही घटना घडली जेव्हा एका प्रवाशाने अधिकाऱ्यांना सांगितले की तो खाली आपला मोबाइल विसरला आहे.
त्यावेळी बोर्डिंगची प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि विमान उड्डाणासाठी जवळजवळ तयार होते. मात्र कर्मचाऱ्याने प्रवाशाला मोबाइल देण्यासाठी खूप मेहनत घेतली.
कॉकपिटच्या खिडकीतून बाहेर झुकल्यानंतर अखेर विमानातील पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रवाशाला मदत करण्यात आली आणि त्याचा मोबाइल त्याच्यापर्यंत पोहोचवण्यात आला.
When our Employees at @LGBairport noticed a Customer’s phone left behind in a gate area after a flight that was already boarded and pushed back from the gate, they didn’t hesitate. #WorldKindnessDay pic.twitter.com/cf3gJy8Nmy
— Southwest Airlines (@SouthwestAir) November 13, 2022
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विमानाचा पायलट कॉकपीटच्या खिडकीतून बाहेर पडून फोन पकडताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर लोक विमान कंपन्यांचे कौतुक करत आहेत.