“प्लिज मला भय्या म्हणू नका” Uber ड्रायव्हरची विनंती! यावर Uber ने केलेलं Tweet देखील चर्चेत
ऑटोवाले, कॅबवाले, रिक्षाचालक यांना तर सहज भय्या, दादा, काका, मामा म्हटलं जातं नाही का?
भय्या किंवा काका.. असे दोन शब्द बिनधास्त वापरले जातात. ऑटोवाले, कॅबवाले, रिक्षाचालक यांना तर सहज भय्या, दादा, काका, मामा म्हटलं जातं नाही का? पण तुम्ही कधी विचार केलाय का की एखादा कॅबवाला या सगळ्याला कंटाळून एक दिवस कॅब मध्येच बोर्ड लावेल. ज्यावर तो लिहील “मला भय्या किंवा काका म्हणू नका”. होय, या कॅबचा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. जेव्हा हे प्रकरण व्हायरल झाले, तेव्हा उबरनेही यावर प्रतिक्रिया दिली आणि लोकांना कॅब वाल्याला त्याच्या नावाने हाक मारण्यास सांगितले.
हा फोटो ट्विटर युजरने 27 सप्टेंबर रोजी @Mittermaniac शेअर करत उबरला टॅग केले होते. 3,000 हून अधिक लाईक्स आणि 200 हून अधिक रीट्वीट मिळाले आहेत.
? ? ? @Uber_India pic.twitter.com/S8Ianubs4A
— Sohini M. (@Mittermaniac) September 27, 2022
त्याचबरोबर अनेक युझर्सनी यावर आपला फिडबॅकही दिला. जसे एका व्यक्तीने लिहिले आहे – मला वाटते की आपण ‘ओ दादा’ म्हणावे. इतरांनी ‘सर’, ‘चीफ’, ‘बॉस’ आणि ‘डॉन’ म्हणण्याचा सल्ला दिलाय.
युझरच्या या ट्विटला उबरच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलने उत्तर दिलं. त्याने 28 सप्टेंबर रोजी लिहिले होते – जेव्हा जेव्हा तुम्हाला शंका असेल तेव्हा ॲपवर चालकाचे नाव तपासा.
काही युझर्सनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. जसे एका व्यक्तीने लिहिले आहे – एका युझरने लिहिले की, “मी प्रत्येक ड्रायव्हरला ‘ड्रायव्हर साहब’ म्हणतो. त्यालाही ते खूप आवडलं. कारण तो २० वर्ष कॅब चालवत होता, त्याला कोणीही साहेब म्हटले नव्हते. अशा वागण्याने तो काही मिनिटे माझ्याशी याबद्दल बोलला.”
हे ट्विट आणि उबरने यावर दिलेलं उत्तर प्रचंड व्हायरल होतंय. लोकं हसून लोटपोट झालेत.