#लतामंगेशकर : मी शब्दांच्या पलिकडे व्यथित, लतादीदींच्या जाण्यानं झालेली पोकळी भरून न येणारी; मोदींकडून श्रद्धांजली

Lata Mangeshkar Nidhan मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालया(Breach Candy Hospital)त आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

#लतामंगेशकर : मी शब्दांच्या पलिकडे व्यथित, लतादीदींच्या जाण्यानं झालेली पोकळी भरून न येणारी; मोदींकडून श्रद्धांजली
लता मंगेशकर, नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 10:53 AM

Lata Mangeshkar Nidhan मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालया(Breach Candy Hospital)त आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोना(Corona)ची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र रविवारी सकाळी 8.12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीतविश्वासह जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरलीय. लता मंगेशकरांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांच्यवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी लता मंगेशकर यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आता जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय. सोशल मीडियावर लता मंगेशकर, #”Nightingale of India”, भारतरत्न, ओम शांती असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेकजण त्यांना आपापल्या परीनं श्रद्धांजली अर्पण करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.

मोदींकडून श्रद्धांजली

मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या लतादीदी आम्हाला सोडून गेल्या. त्या सोडून गेल्यानं एक पोकळी निर्माण झालीय, जी कधीही भरून येणार नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतल्या एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील. त्यांच्या मधूर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Lata Mangeshkar Passed Away : लतादीदी परमेश्वरी अवतार, एका युगाचा अंत, मन सुन्न झालंय, भाजप नेते दरेकरांची प्रतिक्रिया

Lata Mangeshkar | पहिल्यांदा गाण्यातून लतादीदींनी कमावले होते अवघे 25 रुपये! त्याचा खास किस्सा

एक फोटो हजार शब्दांपेक्षा जास्त बोलतो, हे सिद्ध करणारी लतादीदींची खास क्षणचित्र!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.