Ghibli स्टाईलमध्ये दिसले PM Modi; दाखवला ‘न्यू इंडिया’चा संपूर्ण प्रवास
घिबली स्टाईल सध्या खुप ट्रेंडमध्ये आहे. तर या घिबली स्टाईलच्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या अलीकडील अमेरिका आणि फ्रान्सच्या भेटींदरम्यानचे काही फोटोंचा समावेश आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत.

अचानक घिबली स्टाईलचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे, प्रत्येकजण एआयच्या मदतीने स्वत:चे घिबली स्टाईलचे फोटो बनवत आहे आणि शेअर करत आहे. केवळ सेलिब्रिटीच नाही तर आता पंतप्रधान मोदीही या ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. पंतप्रधान मोदींचे एक नाही तर अनेक घिबली स्टाईल फोटो शेअर करण्यात आले आहेत. तसेच हे सर्व फोटो गेल्या काही वर्षांत घडलेल्या महत्त्वाच्या घटनांपासून प्रेरित आहेत आणि या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रसंगी दाखवले आहेत. चला जाणून घेऊया तुम्ही तुमचा स्वतःचा घिबली स्टाईल म्हणजे काय? तसेच या घिबली स्टाईलने फोटो कसा तयार करू शकता?
घिबली स्टाईल म्हणजे काय?
सगळेजण ‘घिबली-घिबली’ म्हणत आहेत पण तुम्हाला माहित आहे का घिबली म्हणजे काय? मीडिया रिपोर्ट्सनुसार, घिबली ही स्टाईल जपानी ॲनिमेशन फिल्म स्टुडिओ घिबली (studio Ghibli)च्या कला शैली आणि कार्टूनपासून प्रेरित आहे, जो त्याच्या रंगीत आणि जादुई डिझाइनसाठी खूप प्रसिद्ध आहे.




Main character? No. He’s the whole storyline
Experience through New India in Studio Ghibli strokes.#StudioGhibli#PMModiInGhibli pic.twitter.com/bGToOJMsWU
— MyGovIndia (@mygovindia) March 28, 2025
घिबली स्टाईलचे पंतप्रधान मोदींचे फोटो पहा
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे घिबली स्टाईलचे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम किंवा एक्स (ट्विटर) अकाउंटऐवजी MyGovIndia च्या एक्स अकाउंटवरून शेअर केले गेले आहेत. फोटो शेअर करताना, ते मुख्य पात्र नसून संपूर्ण कथेचे प्रतिनिधित्व करत आहेत. स्टुडिओ घिबली स्ट्रोकद्वारे नवीन भारताचा अनुभव दाखवत आहेत.
#StudioGhibli #PMModiInGhibli pic.twitter.com/GEk0UE0Eya
— MyGovIndia (@mygovindia) March 28, 2025
पंतप्रधान मोदींचे घिबली स्टाईलचे फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहेत आणि लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. घिबली स्टाईलच्या या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदींच्या हातात तिरंगा धरलेला आहे, डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी, इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी दिसत आहेत.
#StudioGhibli #PMModiInGhibli pic.twitter.com/E30VvJsy5m
— MyGovIndia (@mygovindia) March 28, 2025
घिबली स्टाईलच्या एका फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सैनिकांची मिलिट्रीची वर्दी परिधान केलेले दिसत आहेत. असे एक नाही तर अनेक फोटो आहेत. आता तुम्हाला तुम्हाला हे सर्व फोटो पाहून प्रश्न पडला असेल की हे घिबली स्टाईल टूल कोणी आणले आहे आणि तुम्ही तुमच्या फोटोला घिबली इफेक्ट कसा देऊ शकता? चला ते ही आपण जाणून घेऊयात
घिबली स्टाईल टूल कोणी बनवले?
एआय चॅटबॉट चॅटजीपीटी 4o मध्ये लोकांसाठी घिबली स्टाईल इमेज फीचर समाविष्ट केले आहे, या फीचरने लोकांना काही वेळातच वेड लावले आहे. सध्या हे फिचर्स ChatGPT Plus, Pro, Team सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, एआय जनरेटेड इमेजेसना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, सध्या हे फीचर मोफत वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा आहे की हे एआय फीचर लवकरच मोफत वापरकर्त्यांसाठी देखील आणले जाऊ शकते.
#StudioGhibli #PMModiInGhibli pic.twitter.com/WLU43xwRiy
— MyGovIndia (@mygovindia) March 28, 2025
चॅटजीपीटी सबस्क्रिप्शन किंमत
चॅटजीपीटी प्लस सबस्क्राइब करण्यासाठी, तुम्हाला दरमहा 20 डॉलर म्हणजे आपल्या भारतीय चलनानुसार सुमारे 1711 रुपये खर्च करावे लागतील आणि प्रो सबस्क्रिप्शनसाठी, तुम्हाला दरमहा $200 डॉलर म्हणजेच सुमारे 17111 रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्हालाही घिबली स्टाईलचे फोटो काढायचे असतील तर तुम्हाला किमान 1711 रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागेल.