अखेर पोलिसांनी हात जोडले! नियम पाळा म्हणून सांगून थकले…

पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल आणि कदाचित तुम्हालाही राग येईल.

अखेर पोलिसांनी हात जोडले! नियम पाळा म्हणून सांगून थकले...
not following traffic rulesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 6:09 PM

वाहतुकीचे नियम प्रत्येकाने पाळावेत, अन्यथा आजकाल रस्ते अपघात किती वाढले आहेत, हे आपण पहात असालच. बहुतांश अपघात हे वाहतूक नियमांचे पालन न केल्याने होतात. लोक मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवतात आणि अनेक जण हेल्मेटही वापरत नाहीत. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास लोकांचे जीव धोक्यात येतात, हे उघड आहे. असे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील, जे बाईकवर अनेक लोकांना एकत्र बसवून चालतात. यासंबंधित एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल आणि कदाचित तुम्हालाही राग येईल.

खरंतर या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्यासोबत बाईकवर चार लोकांना बसवलेलं दिसून येतंय. त्याने हेल्मेटही घातलेलं नाही.

त्याला पाहून त्या पोलिसाने हात जोडले आणि अत्यंत विनम्रपणे चालत पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने आपली पत्नी आणि तीन मुलांना बाईकवर कसं बसवलं आहे.

हे दृश्य पाहून त्या पोलिसाने हात जोडून त्या व्यक्तीला ‘कोणी उरले आहे का’, असे विचारले. यानंतर कुटुंब लहान असेल तर थोडी मोठी गाडी बनवली जाईल, असा चिमटा त्यांनी काढला.

मग त्या पोलिसाने दुचाकीवरील प्रवाशांची मोजणी केली आणि पुन्हा चिमटा काढला. यानंतर त्याने त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले.

मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरमध्ये ही घटना घडली. या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @DevendraDube नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आलाय.

मात्र, दुचाकीवर ४-५ जण बसले आहेत. लोक अनेकदा नियमांची पायमल्ली करताना दिसतात, पण ते जोखमीचंही असू शकतं, हे त्यांना समजत नाही.

अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दोनपेक्षा जास्त लोक कधीही दुचाकीवर बसू नयेत याची काळजी लोकांनी नेहमी घ्यायला हवी.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.