दरोगा जी ने दिल जीत लिया! लहान मुलाला वाचविण्यासाठी पोलिसाने पाण्यात उडी टाकली
एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि पोलिसाचं कौतुक करताना थकणार नाही.
काही पोलीस लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. काही वेळा तर ते जीवही धोक्यात घालतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि पोलिसाचं कौतुक करताना थकणार नाही. एक मूल कालव्यात बुडत होते. त्याला पोहता येत नव्हतं. या काळात गुरुसेन बलरामपूरच्या चौकी उत्रौलाचे प्रभारी उपनिरीक्षक गुरुसेन सिंग पाहणीसाठी बाहेर फिरत होते. बुडणाऱ्या मुलावर त्याची नजर पडली तेव्हा त्यांनी काहीही विचार न करता या चिमुरड्याला वाचवण्यासाठी चक्क कालव्यात उडी मारली.
त्यांनी मुलाचा जीव वाचवला. असे पोलिस कौतुकास पात्र असतात, जे कुणालाही मदत करण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडलाय. पोलिस लोकांना मदत करत नाहीत, त्यांची सेवा करत नाहीत, असा विचार करणाऱ्या लोकांच्या समजुती या व्हिडिओमुळे चुकीच्या ठरतात.
मिलिए दरोगा गुरुसेन सिंह से जिन्होंने अपनी जान की परवाह किए बगैर एक बच्चे की जान बचाई।
गुरुसेन बलरामपुर की चौकी उतरौला के प्रभारी है। गश्त के दौरान एक बच्चे को डूबता देख इन्होंने तुरंत नहर में छलांग लगा दी और बच्चे को सुरक्षित बाहर निकाल लाये।@ipskabra pic.twitter.com/PVS3b6i5OO
— जज़्बाती खाकी (@JajbatiKhaki) October 12, 2022
हा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @JajbatiKhaki नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,
“दरोगा गुरुसेन सिंगला भेटा, ज्याने आपल्या जीवाची पर्वा न करता एका मुलाचा जीव वाचवला. बलरामपूरच्या चौकी उत्रौलाची जबाबदारी गुरुसेन यांच्याकडे आहे. गस्तीदरम्यान एका मुलाला बुडताना पाहून त्यांनी तातडीने कालव्यात उडी मारली आणि मुलाला सुखरूप बाहेर काढलं.”