पोलिसाने गायलेलं, ‘दिल संभल जा जरा’ गाणं व्हायरल! ऐकतच बसाल

बरं, तुम्ही गाणी ऐकत नसलात तरी सोशल मीडियाचा वापर करत असाल तर त्याशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यात लोक गाणी गाताना दिसतात. अनेकांचा आवाज इतका सुंदर आणि सुरेल असतो की तो ऐकून मन प्रसन्न होते.

पोलिसाने गायलेलं, 'दिल संभल जा जरा' गाणं व्हायरल! ऐकतच बसाल
Police viral videoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 7:44 PM

मुंबई: जगात फार कमी लोक असतील ज्यांना गाणी ऐकायला आवडत नाहीत. तसे तर प्रत्येकाने गाणी ऐकली पाहिजेत. संगीत ऐकल्याने तणाव दूर होण्यास मदत होते आणि मूडही पूर्णपणे फ्रेश होतो, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. बरं, तुम्ही गाणी ऐकत नसलात तरी सोशल मीडियाचा वापर करत असाल तर त्याशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यात लोक गाणी गाताना दिसतात. अनेकांचा आवाज इतका सुंदर आणि सुरेल असतो की तो ऐकून मन प्रसन्न होते. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो व्यवसायाने पोलीस आहे आणि त्याने इतके जबरदस्त गाणे गायले आहे की लोक त्याचे चाहते बनले आहेत.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाहनांच्या पार्किंगमध्ये उभा असलेला पोलीस आपल्या सुंदर आवाजात ‘दिल संभल जा जरा’ हे गाणं गात आहे. त्याच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे. प्रोफेशनल सिंगर गात असल्यासारखं वाटतं. रजत राठोड असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. रजत दिल्ली पोलिसात काम करतो आणि सोशल मीडियावरही खूप ॲक्टिव्ह असतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तो अनेकदा आपल्या गाण्याशी संबंधित विविध व्हिडिओ शेअर करत असतो, जे लोकांना खूप आवडतात.

रजतचे हे शानदार गाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर म्युझिकल चेंबर नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आले आहे, ज्याला आतापर्यंत 1 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे, तर 10 लाख 2 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक देखील केले आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी रजतच्या आवाजाचं कौतुक करतंय, तर कुणी ‘मोटिव्हेशन असेच असावे’, असं म्हणतंय. एका महिला युजरने लिहिले आहे की, या पोलीस कर्मचाऱ्याने इतके सुंदर गाणे गायले आहे की फक्त हेच ऐकत बसावे असे वाटते.’

Non Stop LIVE Update
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका.
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा.
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?.
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला.
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन.
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले.