बाप गरीब असेल तर मुलगा लवकर मोठा होतो! रडवणारा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये एक लहान मूल पावसात भिजलेली खेळणी विकताना दिसत आहे.
श्रीमंत आणि गरिबी यांतील दरी कमी करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ही दरी कमी होताना दिसत नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत, तर गरीब आणखी गरीब होत आहेत. देशातील गरिबांची संख्या अजूनही कोटींमध्ये आहे. यामध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांच्याकडे राहण्यासाठी घरही नाही. काहींचे घर आहे, मग पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात. अशा घरांतील मुलांनाही लहानपणापासूनच कष्ट करावे लागतात. आजकाल अशाच एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.
या व्हिडीओमध्ये एक लहान मूल पावसात भिजलेली खेळणी विकताना दिसत आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे स्कूटी चालवणारा माणूस बरीच खेळणी एकटाच विकत घेतो आणि त्याला जास्त पैसे देऊन निघून जातो.
यानंतर मुलाच्या चेहऱ्यावर दिसणारं हसू हृदय पिळवटून टाकणारं असतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मूल स्वतः पावसात भिजत आहे, पण पाण्यापासून वाचवून पाठीवर लटकलेली ही खेळणी तो विकण्याचा प्रयत्न करत आहे.
मग एक माणूस त्याला थांबवतो आणि त्याची खेळणी विकत घेतो. यानंतर तो मुलाला 200 रुपये देतो, मग तो मुलगा म्हणतो की त्याच्याकडे परत येण्यासाठी खुले पैसे नाहीत. अशा परिस्थितीत ती व्यक्ती ‘ठेव, बेटा कष्ट करत आहे’ असे म्हणते.
हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून, ‘बाप गरीब असेल तर मुलगा लवकर मोठा होतो’, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
बाप गरीब हो तो बेटे जल्दी बड़े हो जाते हैं ?? pic.twitter.com/rfZJM5ewks
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) December 16, 2022
30 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1,64,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 12,000 हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका यूजरने लिहिले आहे की, हा अतिशय भावनिक सीन आहे, तर दुसऱ्या युझरने ‘आजच्या आयुष्यात कुठेतरी माणुसकी जिवंत आहे’, असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे आणखी एका युझरने लिहिले की, ‘गरिबीमुळे व्यक्ती वयापेक्षा मोठी होते’.