Pre Wedding Photoshoot नागा सोबत! कहर केलाय कहर
Pre Wedding Photoshoot: आपला लग्न सोहळा लक्षात राहावा यासाठी लोकं प्री वेडिंग शूट मध्ये नव्या लोकेशन्ससोबतच काही वेगळ्या थीम्सचाही शोध घेतात. सध्या असेच एक फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. पण हे पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.
मुंबई: भारतीय लग्नांमध्येही काळानुरूप खूप बदल झाले आहेत. लोक आता प्री-वेडिंग फोटोशूट करू लागले आहेत. आपला लग्न सोहळा लक्षात राहावा यासाठी लोकं प्री वेडिंग शूट मध्ये नव्या लोकेशन्ससोबतच काही वेगळ्या थीम्सचाही शोध घेतात. सध्या असेच एक फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. पण हे पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये एक नाग वधू-वरांसोबत पोज देताना दिसतोय. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा नागच या फोटोशूटमधील एक मेन कॅरॅक्टर आहे.
तुम्ही अनेक प्री-वेडिंग फोटोशूट पाहिले असतील, पण तुम्ही कोणाला नागा सोबत पोज देताना पाहिलं आहे का? असंच काहीतरी करून एका जोडप्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिलीये. ट्विटरवर विवेक नावाच्या एका युजरने या अनोख्या प्री-वेडिंग फोटोशूटची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. यामध्ये एक मुलगा आणि मुलगी कसे भेटतात आणि मग प्रेमात पडतात हे फोटोंच्या माध्यमातून दिसत आहे. सगळ्यात गंमत म्हणजे दोघांची भेट. झालं असं की, मुलगी घराबाहेर फिरत असताना तिला नागाचा सामना करावा लागतो. मग स्नेक कॅचर बॉय आपला जीव वाचवतो आणि मग पहिल्या नजरेत तिला त्याच्यावर प्रेम होते.
Pre Wedding Photoshoot ❤️
A Thread: ? pic.twitter.com/8vXpgTRMNK
— vivekk (@oyevivekk) May 27, 2023
हे विचित्र फोटोशूट नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. काही जण म्हणत आहेत- नागराजने जोडी बनवली, त्यामुळे अनेकांना आपलं हसू आवरता येत नाही. एका युजरचं म्हणणं आहे की, शॉर्टफिल्मच्या कॅटेगरीत ऑस्करसाठी नॉमिनेट व्हायला हवं. तर आणखी एक जण म्हणतो, अशा गोष्टी 100 वर्षांतून एकदाच पहायला मिळतात.