आले मोठे शेतात प्री वेडिंग शूट करणारे! झाली फजिती

फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी होऊ लागली आणि आता लग्नात पाहण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की लोकही आश्चर्यचकित होतात. सध्या प्री-वेडिंग शूट्स खूप ट्रेंडमध्ये आहेत, म्हणजे आता लग्नाआधी कपल्स एकमेकांसोबत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करताना दिसतात.

आले मोठे शेतात प्री वेडिंग शूट करणारे! झाली फजिती
Pre wedding shootImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 5:13 PM

एक काळ होता जेव्हा लोक फोटोग्राफी न करता लग्न करायचे. मग आता अशी वेळ आली जेव्हा फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी होऊ लागली आणि आता लग्नात पाहण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की लोकही आश्चर्यचकित होतात. सध्या प्री-वेडिंग शूट्स खूप ट्रेंडमध्ये आहेत, म्हणजे आता लग्नाआधी कपल्स एकमेकांसोबत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करताना दिसतात. तुम्ही पाहिलं असेल की वधू-वर अनेकदा प्री-वेडिंग शूटसाठी सुंदर लोकेशन्स निवडतात, पण तुम्ही कधी शेतात प्री-वेडिंग शूट पाहिलं आहे का? होय, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचेही हसू निघेल.

खरं तर या व्हिडीओमध्ये एक वधू शेतात आपलं प्री-वेडिंग शूट करून घेत आहे. यावेळी फोटोग्राफर तिला लेहंगा धरून कसे चालायचे हे समजावून सांगत असतो, पण समजावून सांगताना तो स्वत: शेतात पडतो. हे दृश्य पाहिल्यानंतर वधूही हसते. या व्हिडिओमध्ये फोटोग्राफर वधूला समजावून सांगताना दिसत आहे की, ‘मॅडम, तुम्हाला तुमचा लेहंगा धरून चालात यावं लागेल’. यावर वधू म्हणते की ‘भैय्या, एवढ्या छोट्या वाटेने मी कसे चालणार’, म्हणून फोटोग्राफर स्वत: ते करून दाखवायचा प्रयत्न करतो की तिने असे चालायचे आहे, पण वाटेत बिचारा तो स्वत:च्या तोंडावर पडतो. यावर सगळे हसतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर kannu_mishraji नावाच्या आयडीसह हा मजेदार प्री-वेडिंग शूट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 57 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 5 दशलक्षाहून अधिक म्हणजे 7 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मला फक्त माझ्या आयुष्यात असा आत्मविश्वास हवा आहे…’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘या मुलीने प्रयत्न केला नाही हे चांगलं’.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.