गर्लफ्रेंडसोबत समुद्र किनारी सुरु होता रोमान्स, तितक्यात तिथे गरोदर पत्नी पोहोचली आणि मग..VIDEO व्हायरल
विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. पत्नीने त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शोधून काढलं. तिने फुलपूफ्र प्लान बनवला.
इंटरनेटच्या युगात कोणतीही गोष्ट लपून केली, तरी ती फार काळ लपून राहू शकत नाही. एक व्यक्ती आपल्या गर्भवती पत्नीला फसवत होता. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, तो दुसऱ्या ठिकाणी गर्लफ्रेंडसोबत होता. त्याचवेळी पत्नीने त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शोधून काढलं. तिने फुलपूफ्र प्लान बनवला आणि दुसऱ्या महिलेसोबत त्याला रंगेहाथ पकडलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
9 महिन्याची गर्भवती असणाऱ्या केली स्मिथने नवऱ्याला समुद्र किनारी दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं. त्यानंतर जे घडलं, ते कुठल्या चित्रपटातल्या सीनपेक्षा कमी नव्हतं. व्हायरल व्हिडिओमध्ये केली रागाच्या भरात फसवणूक करणाऱ्यावर नवऱ्यावर ओरडताना दिसतेय. नवरा आणि त्याची प्रेयसी बीचवर आराम करत होते. व्हिडिओमध्ये गर्भवती महिला जोरात चालत त्यांच्या दिशेने जाताना दिसतेय.
काय बोलायच हे तिला सुचत नाही
रागात ती नवऱ्याला विचारते, ही कोण आहे?. पत्नीला पाहून नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. तो शांतच बसून राहतो. त्यावेळी पत्नी सोबत असलेल्या महिलेच व्हिडिओ रेकॉर्डींग करते. मी याची पत्नी आहे, तू कोण आहेस? अचानक पत्नी येऊन धडकल्याने त्या व्यक्तीची प्रेयसी सुद्धा भांबावून जाते. काय बोलायच हे तिला सुचत नाही. ती काहीच बोलत नाही.
तू इथे मजा करतोयस
त्या व्यक्तीची पत्नी चिडून बोलते, “मी दोन आठवड्यात बाळाला जन्म देणार आहे आणि तू इथे मजा करतोयस” त्यावर नवरा ओरडून बोलतो, आपला घटस्फोट झालाय. पण पत्नीने स्पष्ट केलं की, ‘घटस्फोट झालेला नाही’
Woman is pregnant with her child (9 months) and catches her husband cheating on the beach with the side piece pic.twitter.com/lW6tQim1yR
— Winnie Schola (@WinnieSchola) July 16, 2024
लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला
केलीने स्वत: हा व्हिडिओ टिकटॉकवर शेयर केलाय. हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. बहुतेकांनी त्या व्यक्तीला खडेबोल सुनावताना न्यायाची मागणी केली.