लहानपणी कोडी सोडवण्यात तुम्ही किती तेज होतात? हे कोडं सोडवून दाखवा, लांडगा शोधा
आधीच्या कोड्यांमध्ये आणि आत्ताच्या कोड्यांमध्ये हाच फरक आहे की आधी कोडी तोंडी ऐकून आपल्याला ती मनात रंगवावी लागायची आणि आता जी ऑनलाईन ऑप्टिकल इल्युजनची चित्र आहेत त्यात प्रत्यक्षात सगळंच दिसून येतं. यात फक्त आपल्याला जे सांगितलं जातं ते शोधावं लागतं.
मुंबई: लहानपणी आपण कोडी सोडायचो. उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्ट्या असल्या की घरातले सगळे मोठे लोक आपल्या सगळ्या भांवंडांना एकत्र बसवून कोडी घालायचे. या कोड्याचं उत्तर शोधताना आपल्यात मस्त चढाओढ असायची. स्पर्धा लागायची कोण आधी उत्तर देतंय. आता हीच कोडी ऑनलाईन आली आहेत. आधीच्या कोड्यांमध्ये आणि आत्ताच्या कोड्यांमध्ये हाच फरक आहे की आधी कोडी तोंडी ऐकून आपल्याला ती मनात रंगवावी लागायची आणि आता जी ऑनलाईन ऑप्टिकल इल्युजनची चित्र आहेत त्यात प्रत्यक्षात सगळंच दिसून येतं. यात फक्त आपल्याला जे सांगितलं जातं ते शोधावं लागतं. यात मग कधी प्राणी शोधावा लागतो, कधी बरोबर स्पेलिंग शोधावं लागतं तर कधी अजून काही शोधावं लागतं. ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर शोधताना तुमचं व्यक्तिमत्त्व सुद्धा कळून येतं. ही एकप्रकारची परीक्षा असते.
या फोटोमध्ये गवत आणि झाडे असलेल्या जंगलाचे दृश्य दिसत आहे. त्याच्यामध्ये एक लांडगा आहे, पण आपल्या डोळ्यांना तो सहजासहजी सापडणार नाही. चित्राकडे नीट निरखून पाहिले तर तुम्हाला कदाचित हा लांडगा दिसू शकतो. केवळ 6 सेकंदात लांडगा शोधावा लागत असल्याने 90 टक्के लोकांना याचं उत्तर सापडत नाही असा दावा करण्यात आला आहे. आपले काम 6 सेकंदात लांडगा शोधणे आहे. 6 सेकंदात लांडगा शोधणे हे अवघड काम आहे. लांडगा ओळखण्यासाठी चित्राच्या मधोमध पाहावं लागतं.
तुमच्यापैकी किती जणांना लांडगा सापडला आहे? ज्यांनी लांडगे पाहिले आहेत त्यांचे अभिनंदन, कारण त्यांच्यात उत्तम निरीक्षण कौशल्य आहे. जे अजूनही शोधात गुंतलेले आहेत त्यांना खालील चित्रात उत्तर मिळेल. चित्राच्या डाव्या बाजूला लांडगा दिसतो, त्याच्या रंगामुळे तो झाडे आणि गवतात मिसळला आहे ज्यामुळे प्रथमदर्शनी ओळखणे कठीण झाले आहे.