Optical Illusion तुम्ही त्या 5 टक्के लोकांमध्ये आहात का ज्यांना ती टॉय कार दिसलीये?
या चित्रात एक बाथरूम आहे आणि त्या बाथरूममध्ये लपलेली टॉय कार शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे.
या चित्रात, बाथरूममध्ये लपलेली एक खेळणी कार शोधण्याचे आव्हान आहे. यासोबतच असाही दावा करण्यात आला आहे की, केवळ 5 टक्के लोकांना ती टॉय कार 7 सेकंदात सापडलीये. मग तुम्हाला त्या 5 टक्के लोकांमध्ये व्हायला आवडेल का? अनेकवेळा असे घडते की काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात, पण आपण त्याकडे लवकर लक्ष देत नाही. याला ऑप्टिकल इल्युजन म्हणतात , ज्याने ‘डोळ्यांची फसवणूक’ होते. अशी चित्रे खरोखर गोंधळात टाकतात.
सोशल मीडियावरही आजकाल ऑप्टिकल इल्युजनची छायाचित्रे खूप व्हायरल होत आहेत आणि लोकांची ते सोडविण्यासाठी उत्सुकताही वाढली आहे.
काही ऑप्टिकल भ्रम खूप सोपे असतात, ज्यात लपलेल्या गोष्टी शोधण्यात फारसा त्रास होत नाही, पण काही चित्रे अशी असतात की ती खूपच अवघड असतात. केवळ काही टक्के लोकांनाच त्या चित्रांमधील दडलेल्या गोष्टी शोधता येतात. आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक ऑप्टिकल इल्युजन चित्र घेऊन आलो आहोत.
या चित्रात एक बाथरूम आहे आणि त्या बाथरूममध्ये लपलेली टॉय कार शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. चित्रात तुम्ही पाहू शकता की बाथरूममध्ये टूथब्रश, टूथपेस्ट, हँडवॉश, टॉवेल, टॉयलेट पेपर आणि साबण डिश इत्यादींसह अनेक गोष्टी आहेत. पहिल्या दृष्टीक्षेपात, सर्व काही स्पष्टपणे दिसते पण ती कार काय दिसत नाही.
खेळण्यातील गाडी शोधायची असेल तर बाजासारखे डोळे तीक्ष्ण ठेवावे लागतील. जर तुम्हाला टॉय कार दिसली नसेल, तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ज्या बाजूला टॉयलेट पेपर आणि टूथब्रश ठेवला आहे, तिथे टॉय कार अजिबात नाही, पण तुम्ही जी गोष्ट शोधत आहात ती भिंतीच्या दुसऱ्या बाजूला आहे.
साबणाच्या डब्याजवळ असलेल्या लाल रंगाच्या हँडवॉशच्या शेजारीच टॉय कार आहे आणि ती कार देखील लाल रंगाची आहे. खाली उत्तर दाखवतो बघा.