या चित्रात एकूण किती चेहरे आहेत? तुम्हाला किती दिसले?
लपलेल्या लोकांना 10 सेकंदाच्या आत शोधणे हे आव्हान आहे.
आजकाल सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल होत आहेत, जी बरेचदा चित्रांच्या स्वरूपात असतात. ज्यात काही कोडे असते किंवा वस्तू दडलेली असते, लोकांना ठरलेल्या वेळेत उत्तर शोधण्याचे आव्हान दिले जाते. एवढेच नव्हे तर ती गोष्ट शोधण्यात ९९ टक्के जनता अपयशी ठरल्याचा दावाही केला जातो. तसे या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन असेही म्हणतात, जे लोकांच्या विचारांना चालना मिळावी तयार करण्यात आले आहेत. आता अशाच एका स्केचने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते पाहून लोकांच्या डोक्याचे दही झाले आहे. चला तर मग तुम्ही तयार आहेत याचं उत्तर द्यायला?
ऑप्टिकल इल्युजनला ‘डोळ्यांची फसवणूक’ असेही म्हणता येईल. हे लोकांना आश्चर्यचकित करते. चित्रात जे दिसतं ते खरं की खोटं हे लोक ठरवू शकत नाहीत इतकं गोंधळात टाकणारं हे चित्र असतं.
आज आम्ही तुमच्यासाठी एक असेच रंजक स्केच घेऊन आलो आहोत. हा एक तंबू आहे. या तंबूच्या बाहेर तुम्हाला दोन माणसे दिसतील. पण प्रत्यक्षात मात्र दोन नव्हे तर पाच माणसं आहेत. दोन चेहरे तर दिसून येतायत, उर्वरित लपलेल्या लोकांना 10 सेकंदाच्या आत शोधणे हे आव्हान आहे. लक्षात असू द्या एकूण 5 चेहरे आहेत.
वरील चित्रात कलाकाराने या चित्रात 3 रुग्णांना अशा प्रकारे लपवून ठेवले आहे की आपल्याला ते लगेच सापडणे जवळजवळ अशक्य आहे. म्हणूनच हे स्केच ऑप्टिकल भ्रमाचे अचूक उदाहरण आहे.
हे आव्हान जर तुम्हाला स्वीकारायचं असेल तर वेळ न दवडता चित्राकडे नीट पाहा. कारण तिन्ही चेहरे शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त १० सेकंद आहेत.
जर तुम्ही हार मानली असेल, तर फार काळजी करण्याची गरज नाही, कारण बहुतेक लोक या स्केचमध्ये दडलेले चेहरे शोधण्यात अपयशी ठरले आहेत.
खाली आम्ही तुमच्याबरोबर एक फोटो शेअर करत आहोत, ज्यामध्ये आम्ही लाल वर्तुळात ते लपलेले चेहरे हायलाइट केले आहेत.