या महिलांच्या चेहऱ्यामध्ये एक चेहरा आहे वेगळा, सांगा कोणता?
एक भन्नाट फोटो समोर आला आहे ज्यात एका महिलेचा सर्वात वेगळा चेहरा सांगायचा आहे. त्यासाठी 10 सेकंदांचा अवधी देण्यात आला आहे. खरं तर हे चित्र काहीतरी खास आहे कारण त्यात चेहरा शोधण्याचं काम आहे. यामध्ये एका महिलेच्या चेहऱ्याचा फोटो तयार करण्यात आला असून सुमारे 18 चेहरे शेअर करण्यात आले आहेत.
मुंबई: ऑप्टिकल भ्रम फोटो लोकांची बुद्धिमत्ता आणि त्यांच्या मेंदूची चाचणी घेण्यासाठी खूप चांगले असतात. अनेकदा या फोटोंचं उत्तर अचूक सापडतं. पण अनेकदा असं होतं की लाख प्रयत्न करूनही लोकांना उत्तर देता येत नाही. एक भन्नाट फोटो समोर आला आहे ज्यात एका महिलेचा सर्वात वेगळा चेहरा सांगायचा आहे. त्यासाठी 10 सेकंदांचा अवधी देण्यात आला आहे. खरं तर हे चित्र काहीतरी खास आहे कारण त्यात चेहरा शोधण्याचं काम आहे. यामध्ये एका महिलेच्या चेहऱ्याचा फोटो तयार करण्यात आला असून सुमारे 18 चेहरे शेअर करण्यात आले आहेत. या सर्व चेहऱ्यांची खास गोष्ट म्हणजे ते सर्व सारखेच आहेत, फक्त एका चेहऱ्यावर थोडासा फरक पडला आहे, तोच फरक शोधून सांगावा लागेल.
चित्रानुसार महिलेचा चेहरा बनवण्यात आल्याचे चित्रात दिसत आहे. ते बनवण्यासाठी पेन्सिलचा वापर केलेला दिसतो. अगदी व्यवस्थित त्या बाईचा चेहरा सजवण्यात आला आहे. यातील एक चेहरा वेगळा आहे. अजूनही सापडत नसेल तर उत्तर पुढे वाचा.
योग्य उत्तर काय आहे?
चित्रातील मधल्या ओळीत उजवीकडून येणारा चेहरा इतर चेहऱ्यांपेक्षा वेगळा आहे. नीट पाहिलं तर या चेहऱ्यावर नाकही बनवण्यात आलं आहे, तर इतर कुठल्याही चित्रात नाक लावण्यात आलेलं नाही. अशा प्रकारे हा एकमेव चेहरा इतर सर्व चेहऱ्यांपेक्षा वेगळा आहे. जर तुम्हीही 10 सेकंदाच्या आत उत्तर दिले असेल खूप हुशार आहात.