हत्तीचे किती पाय दिसतायत तुम्हाला?
हे एक हत्तीचं स्केच आहे. आव्हान हे आहे की हत्तीला किती पाय आहेत हे आपल्याला सांगायचंय.
‘ऑप्टिकल इल्युजन’ हे आपली नजर तीक्ष्ण ठेवण्यासाठी एक चांगला आणि मनोरंजक मार्ग आहे. काही ऑप्टिकल भ्रम लोकांच्या लपलेल्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतात, तर काही आपले निरीक्षण कौशल्य आणि बुद्ध्यांकाची चाचणी घेतात. ही चित्रे अशा प्रकारे डिझाइन केलेली आहेत की सगळ्यात हुशार व्यक्तीसुद्धा उत्तर शोधू शकत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक असाच रंजक फोटो घेऊन आलो आहोत. हे एक हत्तीचं स्केच आहे. आव्हान हे आहे की हत्तीला किती पाय आहेत हे आपल्याला सांगायचंय.
खरं तर, लोकांना असे वाटते की ते चित्रात जे पहात आहेत ते खरे आहे. प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच घडतं. भ्रमामुळे मेंदूला ते समजत नाही आणि लोक चित्रांमध्ये दिलेले आव्हान सोडवण्यात मग्न असतात.
मात्र, ज्यांना अशी कोडी सोडवण्यात मजा येते, त्यांच्यासाठी हे काम तितकेसे अवघड नाही. तरीही काही ऑप्टिकल भ्रम लोकांची परीक्षा घेतात. आता हत्तीचे हे चित्र बघा. तुम्हाला हत्तीचे किती पाय दिसतात?
आता किती पाय दिसतायत असं विचारल्यावर नक्कीच तुम्ही खूप विचार करून या चित्राकडे बघत असाल. पण असं नसतं कोडं असलं तरी आपण आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवायला हवा. होय!
या फोटोत हत्तीचे चारच पाय दिसतायत. कोडं आहे म्हणून आपण कधी कधी फार डोकं लावायला जातो पण खरं तर ते तितकं अवघड नसतंच. नीट बघा या फोटोमध्ये हत्तीचे चार पाय दिसून येतील.