Optical Illusion | या चित्रात 8 हा आकडा शोधून दाखवा!
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता आणि आता ते यावर तोडगा काढण्यासाठी या चित्रावर तुम्हाला लक्ष केंद्रीत करावं लागेल. मात्र यामध्ये कोणतीही कालमर्यादा देण्यात आलेली नाही, पण त्यासाठी तुम्ही स्वत: वेळ निश्चित करू शकता आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही किती वेळाने दिले हे कमेंटमध्ये सांगू शकता.
मुंबई: आपल्याला ऑप्टिकल भ्रम सोडवायला आवडतात का? जर होय, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खूप अवघड कोडं घेऊन आलो आहोत. याचं उत्तर शोधायला लोकांना मिनिटे नव्हे तर तास लागतील आणि तरीही हे उत्तर शोधणं कठीण जाईल. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की असे कोणते चित्र असेल जे शोधण्यात तुम्हाला यश येणार नाही. खरं तर हे काही पेंटिंग किंवा आर्ट नाही ज्याला शोधायला फक्त काही सेकंद किंवा मिनिटं लागली. या चित्रात तुम्हाला एक अंक शोधायचा आहे.
होय, आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल, की यावेळी तुम्हाला ऑप्टिकल इल्युजनमधलं एखादं चित्र नव्हे, तर अनेक आकड्यांपैकी एक नंबर शोधायचा आहे. वरील चित्रात तुम्हाला चार हा आकडा दिसतोय. आता युजर्ससमोर आव्हान ठेवण्यात आले आहे की, यापैकी तुम्हाला एकच नंबर शोधायचा आहे जो त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता आणि आता ते यावर तोडगा काढण्यासाठी या चित्रावर तुम्हाला लक्ष केंद्रीत करावं लागेल. मात्र यामध्ये कोणतीही कालमर्यादा देण्यात आलेली नाही, पण त्यासाठी तुम्ही स्वत: वेळ निश्चित करू शकता आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही किती वेळाने दिले हे कमेंटमध्ये सांगू शकता.
हा व्हायरल फोटो एका युजरने ट्विटरवर शेअर केला आणि तेव्हापासून लोक यावर उपाय शोधण्यासाठी अस्वस्थ झाले. चित्रात आपण पाहू शकता की फक्त 4 नंबर दिसत आहेत, परंतु या चित्रात एक 8 नंबर देखील लपलेला आहे. हे गुपित जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तीक्ष्ण नजरेचा वापर करावा लागेल.