चित्र नीट पहा, खरा बॉस कोण हे सांगू शकाल का?
हे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा लागेल. या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या ऑफिसमध्ये, चित्रात खरा बॉस कोण आहे हे ओळखावे लागेल. हे कोडं तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेतं आणि तुमच्यासाठी एक आव्हान तयार करतं.
मुंबई: आपण लहानपणापासून कोडे सोडत आलोय. आता कोड्यांची नवी पद्धत आलीये. ऑप्टिकल इल्युजन. हे ऑप्टिकल इल्युजन एकदम हटके आहे. उपाय थेट आपल्यासमोर नाही पण हे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा लागेल. या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या ऑफिसमध्ये, चित्रात खरा बॉस कोण आहे हे ओळखावे लागेल. हे कोडं तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेतं आणि तुमच्यासाठी एक आव्हान तयार करतं. या फोटोत ऑफिसच्या खोलीत तीन जण दिसत आहेत. आता प्रश्न आहे “बॉस कोण आहे?”
खरा बॉस कोण हे सांगू शकाल का?
कोड्यात तुम्हाला खरा बॉस शोधावा लागेल. चला तर मग ऑफिसवर बारकाईने नजर टाकूया. पहिली व्यक्ती बॉसच्या डेस्कजवळ उभी असते आणि खोलीतील इतर दोघांना संबोधित करत असते. समोर टेबलवर बसलेली दुसरी व्यक्ती काहीतरी विचार करत असते. तर तिसरी व्यक्ती उभी राहून पहिल्या व्यक्तीकडे लक्ष देत असते. या तिघांपैकी खरा बॉस कोण? याचं उत्तर अर्थातच ऑफिसमध्येच दडलेलं आहे. आत्तापर्यंत उत्तर लक्षात आले आहे का? लक्षात घ्या की ब्लेझर बॉसच्या खुर्चीवर लटकलेला आहे आणि तिघांपैकी कोणाकडे ब्लेझर नाही.
योग्य उत्तर सांगणे इतके सोपे नाही
पहिल्या व्यक्तीने आधीच ब्लेझर घातला आहे, तर दुसऱ्या व्यक्तीने फुल स्लीव्ह टी-शर्ट घातला आहे. त्याचवेळी तिसरी व्यक्ती फक्त शर्ट घालून आणि हातात चष्मा धरून विचार करत असते. ऑफिस रूमच्या चित्रातील खरा बॉस ही तिसरी व्यक्ती आहे. हा ब्रेन गेम म्हणजे आणखी एक मनोरंजक आयक्यू टेस्ट आहे. काय मग कळलं ना उत्तर? तिसरा माणूस बॉस आहे.