कॉफी बीन्समध्ये लपलाय माणसाचा चेहरा! शोधा बरं…
ऑप्टिकल इल्यूजन पिक्चर्सची एक खास गोष्ट म्हणजे जी गोष्ट तुम्हाला शोधण्याचं काम दिलं जातं ते तुमच्या डोळ्यांसमोरच असतं पण तुम्हाला ते समजत नाही.
आजकाल सोशल लोकांना सर्वाधिक पसंत पडणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती आहे ऑप्टिकल इल्युजन. खरं तर, लोकांना अशी कोडी सोडवण्यात मजा येते. आपण आतापर्यंत अनेक आश्चर्यकारक ऑप्टिकल भ्रम पाहिले असतील, ज्यात लपलेली रहस्ये सोडवण्यासाठी डोक्याचं अक्षरशः दही होतं. काही चित्रांतून तुमचं व्यक्तिमत्त्वही खुलून दिसतं. संशोधन असे सांगते की, अशी चित्रे केवळ आपल्या मेंदूचा व्यायाम करत नाहीत, तर निरीक्षण कौशल्य सुधारण्याबरोबरच छोट्या छोट्या गोष्टी पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचीही परीक्षा घेतात.
ऑप्टिकल इल्यूजन पिक्चर्सची एक खास गोष्ट म्हणजे जी गोष्ट तुम्हाला शोधण्याचं काम दिलं जातं ते तुमच्या डोळ्यांसमोरच असतं पण तुम्हाला ते समजत नाही.
सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत येत आहे, ज्यात कॉफी बीन्समध्ये कुठेतरी माणसाचा चेहराही लपलेला आहे.
सुरुवातीला, आपल्याला हे चित्र कॉफी बीन्सचा ढीग सापडेल. पण तो मजेशीर ट्विस्ट आहे. कलाकाराने कॉफी बीन्सच्या मध्ये चेहरा अशा प्रकारे बसवला आहे की लाखो प्रयत्न करूनही दिलेल्या वेळेत लोक दिसत नाहीत.
जर तुम्ही हुशार आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर मग उशीर कसला. तयार व्हा आणि 10 सेकंदात त्या माणसाचा चेहरा शोधा.
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर तुम्हाला 3 सेकंदात मानवी चेहरा सापडला तर तुमच्या मेंदूची उजवी बाजू इतरांपेक्षा जास्त विकसित आहे.
त्याचबरोबर त्यापेक्षा जास्त म्हणजे एक मिनिट घेतले तर तुमच्या मेंदूचा उजवा भाग पूर्णपणे विकसित होतो. त्याचबरोबर एक ते तीन मिनिटांच्या मेंदूचा उजवा भाग हळूहळू गोष्टींचे विश्लेषण करीत असतो. ज्या लोकांना तीन मिनिटंही चेहरा दिसत नाही, त्यांच्या मेंदूला व्यायामाची गरज असते.