मालक नसलेली छत्री शोधा! निरखून पहा, उत्तर सापडेल
सर्व प्रयत्न करूनही ती छत्री मिळत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. खाली दिलेल्या चित्रात आम्ही तुम्हाला ती छत्री कुठे आहे ते सांगतो.
ऑप्टिकल इल्युजन हा एक स्मार्ट गेम आहे. यात तुम्हाला तुमचं निरीक्षण कौशल्य किती चांगलं आहे हे कळतं. डोळे एक सांगतात मेंदू एक सांगतो. मेंदू आणि डोळ्यांची सांगड घालता घालता माणूस वैतागून जातो. आजवर आपण अनेक चित्र पाहिली ज्यात कधी लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात, कधी चित्रात आधी काय दिसतंय हे सांगायचं असतं तर कधी चित्रातलीच चूक सांगायची असते. या दिलेल्या चित्रात तुम्हाला खूप छत्र्या दिसतील. यामध्ये तुम्हाला बिना मालकाची छत्री शोधायची आहे.
ऑप्टिकल इल्यूजन चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधताना मेंदूची केवळ गती नाही, तर तुमची बुद्ध्यांक पातळीही कळते. या चित्रात पावसाळ्यातील शहराची वाहतूक दिसते.
चित्रात अनेक लोक छत्री घेऊन चालताना दिसतात. या चित्रात कलाकाराने चतुराईने एक छत्री लपवून ठेवलीये जिला मालक नाही. म्हणजे ती छत्री हवेत कुठेतरी पडलेली आहे.
10 सेकंदाच्या आत छत्री शोधावी लागते. हेच खरे आव्हान आहे. चला तर मग चित्रावर डोळे फिरवा, निरखून पहा आणि छत्री शोधा.
तुमची जर गरुडासारखी तीक्ष्ण नजर असेल तर लगेच छुपी छत्री सापडेल. कलाकाराने ते चित्र अशा प्रकारे बनवले आहे की ती छत्री तुम्हाला सहजासहजी दिसणार नाही.
सर्व प्रयत्न करूनही ती छत्री मिळत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. खाली दिलेल्या चित्रात आम्ही तुम्हाला ती छत्री कुठे आहे ते सांगतो. तो पंधरा वर्तुळ बघा.
वर्तुळातली छत्री ही मालकाशिवाय असणारी छत्री आहे. उत्तर कळल्यानंतर कदाचित तुम्ही डोक्यावर हात ठेवून विचार कराल अरे आपण तर पाहिली होती पण आपण लक्ष दिलं नाही.