आई ही नेहमीच आई असते, मग तो माणूस असो वा प्राणी. आई मुलांना चालायला, धावायला, खायला शिकवते शिवाय, त्याच वेळी ती त्यांचे सर्व प्रकारे संरक्षण करते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये आईची ममता आणि तिची ओढ दिसून येते. असाच एक अप्रतिम व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही नक्कीच म्हणाल की, आई अशीच असते. हा व्हिडिओ एका महाकाय मादी अजगराचा आहे, जी आपल्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी काहीही करण्यास तयार असते. (python Attack Video Man wanted to touch the python eggs then snake attack video viral)
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मादी अजगर एका छोट्या बॉक्समध्ये भरपूर अंडी घालून बसलेली आहे. ही अंडी त्याच अजगराची आहेत, ज्यामध्ये त्याची पिल्ले वाढत आहेत. आता तुम्हाला हे माहित असेलच की, काही सापांच्या प्रजाती सोडल्या तर बहुतेक साप थेट पिल्लं जन्माला घालत नाहीत, आधी अंडी घालतात, जी काही दिवसांनी उबवतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येतात. त्यामुळे ही मादी अजगर आपल्या पिल्लांचे म्हणजेच अंड्यांचे रक्षण करत आहे.
यादरम्यान एक व्यक्ती त्या मादी अजगराच्या अंड्यांना स्पर्श करण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण अजगराची मादी त्याला अंड्याजवळ येऊही देत नाही आणि त्याला चावण्यास सुरुवात करते. माणूस उजवीकडे आणि डावीकडे सर्व बाजूंनी प्रयत्न करून थकला, परंतु मादी अजगराने तिच्या अंड्यांना हात लावू दिला नाही. हा व्हिडीओ एका आईच्या अप्रतिम प्रेमाची प्रचिती देतो.
व्हिडीओ पाहा:
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर jayprehistoricpets नावाने शेअर करण्यात आला आहे आणि ‘आई तिच्या पिलांच्या संरक्षणासाठी कुठल्याही थराला जाते’ असे कॅप्शन लिहिले आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत याला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर 54 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. या मातेच्या प्रेमाला लोक नमस्कार करताना थकत नाहीत. तुम्ही पण हा व्हिडिओ एकदा जरूर पहा.
हेही पाहा: