QR Code वाली मेहंदी! बहिणीच्या हातावर मोबाईल पकडून भावाने कोड स्कॅन केला आणि मग…
आता या QR Code चे पण वेगळे विषय असतात. हे कधी स्कॅन होतं, कधी होत नाही, कधी झालं तर कळत नाही पण या QR Code ने आयुष्य मात्र जरा सोपं केलंय नाही का? सध्या हाच QR Code व्हायरल होतोय. काय कारण आहे? बघुयात...
मुंबई: डिजिटल इंडिया! पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारताला डिजिटल भारत बनवण्याचं स्वप्न आपल्यालाही हवंहवंसं असणारं आहे. आता सगळ्या गोष्टी हळू हळू डिजिटल व्हायला लागल्यात. जिथे जाईल तिथे गुगल पे, फोन पे. आता तर आपल्याला याची इतकी सवय झालीये की आपण एटीएम मधून पैसे काढतच नाही आपण ऑनलाइनच पैसे देतो. उलट कधीतरी आपल्याला कॅश लागते आणि मग आपण खडबडून जागे होतो. नाहीतर इतरवेळेला आहेच आपला QR Code जिंदाबाद!
QR Code मेहंदी
जर आम्ही तुम्हाला सांगितलं की QR Code मेहंदी मध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतो तर? धक्का बसेल होना? QR Code जर समजा मेहंदी मध्ये असेल तर तो स्कॅन होईल का? स्कॅन झाला तर पुढे काय होईल मग पैसे काढता येतील का? मग हे QR Code ची डिझाईन बनवणारे मेहंदीवाले आपल्या फोनचा QR Code बघून त्याची डिझाईन तयार करत असतील का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतील होना? असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक मुलीच्या हातावर QR Code आहे. खरं तर ही QR Code ची मेहंदी आहे. ही स्कॅन केल्यावर काय होतं ते तर बघा.
View this post on Instagram
आम्ही तुम्हाला सत्य सांगतो…
व्हायरल होणारा हा व्हिडीओ मेहंदीवर असणाऱ्या QR Code चा आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या बहिणीने आपल्या हातावर QR Code ची डिझाइन काढली आहे. ती भावाला म्हणते आता जर हा QR Code स्कॅन झाला तर तुला मला 5 हजार द्यावे लागतील. मग तिचा भाऊ तो मेहंदीचा QR Code स्कॅन करतो आणि पुढे ते स्कॅन होतं. हा व्हिडीओ बघून तुम्हाला धक्का बसेल. पण आम्ही तुम्हाला सत्य सांगतो, हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. हा व्हिडीओ ज्याने टाकलाय त्याने सांगितलं की त्याने तो एडिट केलाय. खरंच आहे असे जर QR Code निघाले तर कसं व्हायचं मग? हा व्हिडीओ केवळ मनोरंजनाच्या हेतूने बनवण्यात आलाय.