बास्केटबॉल खेळणारी खारुताई पाहिली आहे? व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल..!

खारुताई ( Squirrel) ही जगातील सर्वात खोडकर प्राण्यांपैकी एक. बऱ्याचदा तुम्ही खारुताईला अनेक आश्चर्यकारक गोष्टी करताना पाहिलं असेल. अगदी माणसाप्रमाणे बसून खाणं असो की वेगवेगळ्या आवाजात ओरडणं.

बास्केटबॉल खेळणारी खारुताई पाहिली आहे? व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल..!
Squirrel playing basketball
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 11:42 AM

खारुताई कुणाला नाही आवडत, दिसायला अगदी गोंडस, चपळ आणि चलाख. खारुताई ( Squirrel) ही जगातील सर्वात खोडकर प्राण्यांपैकी एक. बऱ्याचदा तुम्ही खारुताईला अनेक आश्चर्यकारक गोष्टी करताना पाहिलं असेल. अगदी माणसाप्रमाणे बसून खाणं असो की वेगवेगळ्या आवाजात ओरडणं. जरी खारुताई या खूप भित्र्या असल्या, तरी त्या लवकरच माणसाळतात. म्हणूनच बऱ्याचदा अन्नाच्या शोधात त्या माणसांकडे येत असतात. आजकाल एक खारुताई एका खास कारणामुळे चर्चेत आहे. कारण, एकाने रेडीट्ट या सोशल मीडिया ( reddit.com)साईटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात खारुताई चक्क बास्केटबॉल खेळत आहे. ( Squirrel playing basketball. video goes hugely viral )

खारुताईचा हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, काही खेळाडू कोर्टवर बास्केटबॉल खेळत आहेत. तेवढ्यात एक खारुताई तिथं पोहचते. आणि ती बास्केटबॉलसोबत खेळण्यास सुरुवात करते. त्याच वेळी, कोर्टवरील खेळाडू देखील खारुताईला बॉल पास करतात. या दरम्यान, एक खेळाडू बॉल हातात घेऊन खारुताईला आव्हान देतो, पण तरीही ती मागे हटत नाही. खारुताई हा बॉल पळवण्याचा खूप प्रयत्न करते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. एका नेटकरी म्हणाला, हा व्हिडिओ खरोखर मजेदार आहे. त्याच वेळी, दुसर्‍या नेटकऱ्याने कमेंट केली, खारुताई खरोखर खूप मस्त आहे आणि हा व्हिडीओ पाहून मी आनंदी झालो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच, मात्र व्हिडीओ पाहून लोक खुशही झाले. बास्केटबॉल कोर्टवरील खेळाडूच्या शैलीती खारुताईला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. हा व्हिडिओ एका रेडडिट युजरने शेअर केला आहे, जो आता नेटवर तुफान व्हायरल होतो आहे.

हेही वाचा:

शेकडो किलोचे ओंडके ट्रकवर चढवण्यासाठी मजुरांची ‘आयडियाची कल्पना’, टीमवर्क पाहून नेटकरीही आवाक

महादेवाच्या मंदिरात झोपला होता मुलगा, अचानक कोब्रा त्याच्या चादरीत शिरला, आणि त्यानंतर…

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.