नोकरीला लाथ मारली, 50 राज्यातल्या 50 पेक्षा जास्त पोरींना डेटवर नेलं, तरी म्हणतो…

तो अमेरिकेच्या मोन्टानात राहतो. आधी अमेरिकेतच नोकरी करत होता. पगारपाणीही चांगला होता. पण, त्याचं मन काही नोकरीत रमत नव्हतं.

नोकरीला लाथ मारली, 50 राज्यातल्या 50 पेक्षा जास्त पोरींना डेटवर नेलं, तरी म्हणतो...
मॅथ्यूने आतापर्यंत 100 हून अधिक मुलींना डेटवर नेलं आहे.
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 6:30 PM

आयुष्यात कुणाचं काय ध्येय असेल सांगता येत नाही. नोकरी-धंद्याच्या जोखडात एखादा अडकतो, आणि आयुष्य अडकूनच बसतो. पण, जगाच्या पाठीवर असेही लोक आहे, की जे ही चौकट मोडतात, आणि स्वच्छंदी आयुष्य जगतात. अशाच एका इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरची (Instagram Influencer) कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगतोय,  ज्याचं ध्येय काहीतरी वेगळंच आहे. त्याचं ध्येय आहे, अमेरिकेतल्या 50 राज्यातल्या 50 मुलींना डेट (50 State 50 Dates) करण्याचं. बरं, या भावाने हे ध्येय पूर्णही केलं आहे, तरी त्याला त्याच्या आयुष्याची साथीदार सापडलेली नाही.

या तरुणाचं नाव आहे मॅथ्यू वर्निंग. (Matthew Wurnig) तो अमेरिकेच्या मोन्टानात राहतो. मॅथ्यू आधी अमेरिकेतच नोकरी करत होता. पगारपाणीही चांगला होता. पण, त्याचं मन काही नोकरीत रमत नव्हतं. घरी गेल्यावर डेटींग साईटवर तो मुलींशी बोलायचा. हेच करता करता, डेटिंग हेच त्याच्या आयुष्याचं मिशन बनलं.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत मॅथ्यूने अनेल मुलींना डेट केलं आहे

50 States 50 Dates Matthew Wurnig

मॅथ्यू त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या सगळ्या डेट्सचे अपडेट टाकत असतो

परफेक्ट पार्टनर शोधण्यासाठी मॅथ्यूने एक मिशन सुरु केलं आहे. 50 Dates, 50 States, म्हणजे 50 राज्यातल्या 50 मुलींना डेट करणं. तो कार घेऊन अख्ख्या अमेरिकेतल्या वेगवेगळ्या राज्यात फिरतो. तिथं मुलींना भेटतो, त्यांना डेट करतो. त्याने आतापर्यंत 100 हून अधिक मुलींना डेटही केलं आहे.

मॅथ्यू म्हणतो, मी वेगवेगळ्या राज्यातल्या खूप मुलींना भेटलो, प्रत्येकीचा स्वभाव, वागणं, राहणं वेगवेगळं आहे. मी मुलींना समजून घेण्याचा प्रयत्नही केला. पण तरीही मला अजूनही मुलींचा स्वभाव कळाला नाही.

मॅथ्यूचं इन्स्टाग्राम अकांऊंट अशा फोटोंनी भरलेलं आहे

मॅथ्यूच्या या अॅडव्हेंचरची सुरुवात झाली लॉकडाऊनमध्ये. लॉकडाऊनमध्ये रिकाम्या वेळेत मॅथ्यूने डेटींग अॅपवर अकाऊंट उघडलं, टिंडरसारख्या डेटींग अॅपवर त्याने मुलींशी बोलणं सुरु केलं. जसं लॉकडाऊन संपलं, तसा तो सर्वांना भेटू लागला. आणि त्याच्या आयुष्याचं हे मिशनच झालं.

मॅथ्यू आता एक यशस्वी टीकटॉकर आहे. त्याला इन्स्टाग्रामवर 28 हजाराहून अधिक फॉलोअर आहेत. तो आपल्या दररोजच्या अपडेट टीकटॉक आणि इन्स्टाग्रामवर टाकत असतो. अजूनही खूप मुलीशी बोलण्याची, त्यांना भेटण्याची इच्छा असल्याचं मॅथ्यू सांगतो. मॅथ्यूला अद्यापही त्याच्या आयुष्याची साथीदार भेटलेली नाही. ती जोपर्यंत भेटत नाही, तोवर तो शोध सुरुच ठेवणार असल्याचं सांगतो.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.