VIDEO | रणवीर सिंगच म्हणतो ही तर छोटी दीपिका, ‘रामलीला’तील भन्नाट डायलॉग व्हायरल

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘ओम शांति ओम’ या सिनेमातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तिने एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये (Movie) काम केले.

VIDEO | रणवीर सिंगच म्हणतो ही तर छोटी दीपिका, 'रामलीला'तील भन्नाट डायलॉग व्हायरल
दीपिका पादुकोन
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 3:17 PM

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘ओम शांति ओम’ या सिनेमातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तिने एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये (Movie) काम केले. दीपिकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण, त्याचा काहीही परिणाम तिने तिच्या करियरवर होऊ दिला नाही. विशेष म्हणजे दीपिकाचे चित्रपटातील काही डायलाॅग इतके हिट होतात की, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती दीपिकाचा डायलाॅग बोलण्याचा प्रयत्न करतो.

तुम्ही छोट्या दीपिका पादुकोणला बघितले आहे?

नुकताच सोशल मीडियावर दीपिकाच्या रामलिला चित्रपटातील डायलाॅग बोलतानाचा एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही मुलगी दीपिकाप्रमाणेच ड्रेसिंग आणि मेकअप करून बसली आहे आणि रामलिला चित्रपटातील डायलाॅग बोलते आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सर्वजण या मुलीचे काैतुक करताना दिसत आहेत.

इथे पाहा रणवीरने शेअर केलेला व्हिडीओ

या मुलीने हा डायलाॅग बोलताना दीपिकाने ज्याप्रमाणे एक्सप्रेशन दिले आहेत. तसेच एक्सप्रेशन देखील दिले आहे. या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर रणवीर सिंगने देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत रणवीर सिंग म्हणाला की, लीला जैसी कोई नाही! दीपिका हे बघ छोटी दीपिका. या लहान मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांनाच आवडतो आहे. बरेच युजर्स हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.

चित्रपट समीक्षक कौशिक एल.एम यांनी शेअर केलेला व्हिडीओ

चित्रपट समीक्षक कौशिक एल.एम यांनी शेअर केला व्हिडीओ 

हा व्हिडीओ चक्क चित्रपट समीक्षक कौशिक एल.एम यांनी ट्विटरवर शेअर करत या मुलीचे काैतुक केले आहे. कौशिक एल.एम यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, काय… moj वर तिचे 10M फॉलोअर्स आहेत. #ChotiDeepika कौशिक एल.एम यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने कमेंट करत लिहिले आहे की, हो सर तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर आहे. दुसऱ्या युजर्स लिहिले की, ही छोटी मुलगी खूपच गोड आहे.

संबंधित बातम्या : 

Video : मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला, पाय घसरुन पडला, चक्क डोंगराच्या मधोमध अडकला, 127 Hours सिनेमापेक्षाही भयंकर!

VIDEO : लग्नातील वऱ्हाडींचा श्रीवल्ली ठेका, डान्स पाहून जेवणकऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.