श्रीमंतीचा ‘हा’ मूलमंत्र वाचा अन् बना वॉरेन बफेसारखे अब्जाधीश
वॉरन बफे यांची एकूण संपत्ती 7.98 लाख कोटी रुपये आहे. त्यांची संपत्ती यूएस जीडीपीच्या 0.436 टक्के आहे. वॉरन बफे कधीही आपल्या नाश्त्यावर 3.17 डॉलर पेक्षा जास्त खर्च करत नाहीत.
‘स्वप्ने ती असतात, जी झोपू देत नाहीत’, हा दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून अनेक जण श्रीमंत बनण्याचं स्वप्न पाहतात. अनेकांची त्या दिशेने यशस्वी वाटचाल होते, तर काहींची वाटचाल चुकतेही. अशा लोकांना यशाची गुपिते समजण्यात अडचण आलेली असते. त्यांच्या समोर कुणी मार्गदर्शक नसतो. अशा परिस्थितीत जर आपणाला वॉरेन बफे (Warren Buffet) बनण्याचे स्वप्न अस्वस्थ करत असेल तर हार मानून चालणार नसते. यशाचा मार्ग इथेच दिशा धरणारा असतो. वॉरेन बफे यांची कहाणी अशीच आहे. बफे यांच्यासारखे आपल्यालाही अब्जाधीश (Billionaire) बनता येईल. फक्त त्यासाठी आपल्याला ही दोन कामे (Two Works) करावी लागतील. मग पहा काही मिनिटातच अब्जाधीश बनण्याची जादू कशी घडते ते.
वॉरेन बफे जगातील सहावे श्रीमंत
वॉरन बफे हे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार मानले जातात. त्यांचा जन्म अमेरिकेतील नेब्रास्का येथे एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला. त्यांनी वयाच्या 11 व्या वर्षापासून शेअर बाजारात पैसे गुंतवायला सुरुवात केली. आजपर्यंत ते जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. यासोबतच ते प्रसिद्ध बर्कशायर हॅथवे कंपनीचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आणि सीईओ देखील आहेत. सध्या ते 92 वर्षाचे आहेत.
वॉरन बफे यांची एकूण संपत्ती 7.98 लाख कोटी रुपये आहे. त्यांची संपत्ती यूएस जीडीपीच्या 0.436 टक्के आहे. वॉरन बफे कधीही आपल्या नाश्त्यावर 3.17 डॉलर पेक्षा जास्त खर्च करत नाहीत. याशिवाय ते अजूनही 1958 मध्ये विकत घेतलेल्या घरातच राहतात.
वॉरन बफेंच्या यशाचे 2 नियम
नियम क्रमांक 1 – नेवर लूज मनी म्हणजे कधीही पैसे गमावू नका नियम क्रमांक 2 – पहिला नियम कधीही विसरू नका
वॉरन बफेकडून काय शिकावे ?
1. वॉरेन बफेकडून तुम्ही हे शिकले पाहिजे की, गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टींचे पालन केले पाहिजे म्हणजे शेअर्स खरेदी करा आणि ते दीर्घकाळ टिकवून ठेवा आणि त्याचे अनुसरण करा.
2. यासोबतच जेव्हा लोक बाजारात लोभी असतात तेव्हा तुम्ही भित्रे बना आणि जेव्हा ते घाबरतात तेव्हा तुम्ही लोभी बना.
3. जर कोणत्याही चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीत असतील तर ते खरेदी करा आणि वाजवी कंपनीचे शेअर्स जास्त किंमतीला विकत घेऊ नका.
4. पोर्टफोलिओ नेहमी वैविध्यपूर्ण ठेवा. याशिवाय जोखीम कमी करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.
स्पष्टपणे लिहायला आणि बोलायला शिका
जर तुम्हाला जगात तुमचे मूल्य वाढवायचे असेल तर तुम्हाला दोन गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्व प्रथम, आपण स्पष्टपणे लिहायला आणि बोलायला शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही तुमचे मूल्य किमान 50 टक्क्यांनी वाढवू शकता, वॉरेन बफे यांनी म्हटले आहे.
पैशाने प्रेम विकत घेता येत नाही
वॉरेन बफेने प्रेम आणि पैशाची तुलना केली आहे. आपण पैशाने प्रेम विकत घेऊ शकत नाही. म्हणजेच, प्रेमाची समस्या अशी आहे की, आपण ते विकू शकत नाही. जर तुम्हाला कोणाकडून प्रेम हवे असेल तर तुम्हाला त्याच्या बदल्यात प्रेम द्यावे लागेल.
जर तुमच्याकडे खूप पैसे असतील तर ते खूप त्रासदायक आहे. पैशाने तुम्ही प्रेम विकत घेऊ शकता असे तुम्हाला वाटत असेल तर ते शक्य नाही. तुम्ही लोकांना जितके प्रेम द्याल तितके जास्त तुम्हाला मिळेल.