असाही एक देश जिथे बायका भाड्याने मिळतात; प्लेजर मॅरेज फॅड वाढतयं

प्लेजर मॅरेज इंडोनेशियासारख्या देशांमध्ये एक अनोखी आणि जटिल विवाह पद्धत आहे. याचा प्रभाव केवळ व्यक्तीवरच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्था, समाज आणि सांस्कृतिक मूल्यांवर देखील पडतो. अशा प्रकारच्या विवाहांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना आर्थिक फायद्याचा अनुभव होत असला तरी, त्यातील दबाव आणि दृष्टीकोनावर विचार करणे महत्त्वाचे आहे.

असाही एक देश जिथे बायका भाड्याने मिळतात; प्लेजर मॅरेज फॅड वाढतयं
Pleasure MarriageImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 5:37 PM

तुम्ही अनिल कपूरचा नायक सिनेमा पाहिला असेल. या सिनेमात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो. त्यानंतर जे घडतं ते निव्वळ अप्रतिमच. खरं तर हा कल्पनाविलास होता. पण सिनेमात तो उत्तमपणे हातााळला गेलाय. पण कल्पना करा, तुम्हाला दोन चार दिवसांसाठी बायको मिळाली तर? नाही ना बसत विश्वास. पण ते शक्य आहे. दोन तीन दिवसासाठी बायको मिळते. जगात असेही देश आहेत की जिथे चित्रविचित्र प्रथा आहेत. इंडोनेशिया हा त्यापैकीच एक. या देशात चक्क भाड्याने बायको मिळते. ती तुमची नवऱ्यासारखीच सेवा करते. इंडोनेशियात येणारा प्रवासी स्वतःच्या इच्छेप्रमाणे एक स्त्री निवडतो आणि काही काळासाठी तिला पत्नी म्हणून स्वीकारतो. हा प्रकार “प्लेजर मॅरेज” म्हणून ओळखला जातो.

प्लेजर मॅरेजचा बोलबाला

दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये प्लेजर मॅरेजचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: इंडोनेशियामध्ये हा प्रकार खूप दिसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडोनेशियामध्ये प्लेजर मॅरेज एक मोठा उद्योग बनला आहे. अनेक स्त्रिया आपला उदरनिर्वाह आणि पैसे कमावण्यासाठी प्लेजर मॅरेजमध्ये भाग घेतात. यामुळे इंडोनेशियाच्या पर्यटन क्षेत्राला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळाली आहे.

कसं असतं प्लेजर मॅरेज?

इंडोनेशियामध्ये प्लेजर मॅरेज एक व्यवसाय बनला आहे. विशेषतः गावांतील महिला या व्यवसायाचा भाग बनल्या आहेत. बेरोजगारी आणि कमालीचं दारिद्रय यातून हा प्रकार उद्याला आला आहे. काही महिलांना त्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे मिळवण्यासाठी या व्यवसायात भाग घेण्याचा दबाव असतो, तर काही महिलांनी स्वेच्छेने हा व्यवसाय स्वीकारला आहे. रियल इस्टेट उद्योगासारखे, येथे देखील दलाल आहेत जे प्रवाश्यांना त्यांच्या आवडीनुसार महिलांशी परिचय करून देतात आणि नंतर त्या दोघांचा विवाह होतो.

प्लेजर मॅरेज कसा होतो?

या कामासाठी या देशात एजन्सी आहेत. एका रिसॉर्टमध्ये या एजन्सी आलेल्या पर्यटक पुरुषांची स्थानिक महिलांशी परिचय करून देतात. त्यानंतर त्यांचा तात्पुरता विवाह होतो. तसा करार केला जातो. एकदा दोन्ही पक्षांचा सहमती होऊन, एक झटपट आणि अनौपचारिक विवाह समारंभ पार पडतो. त्यानंतर, पुरुषाला त्या महिलेला ताबडतोब रोख रक्कम चुकवावी लागते, या महिलेची ती किंमत असते.

ज्या महिलाही हा तात्कालिक विवाह करतात, त्यांना विदेशी पतींसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतात आणि घरातील बाकीचे कामही करावे लागते. जसजसा पतीचा व्हिसा समाप्त होतो आणि प्रवासाचा कालावधी संपतो, तसतसे हे विवाह “ऑटोमॅटिक” संपला असे मानले जाते. म्हणजेच, विवाहाचा कालावधी फक्त प्रवासाच्या काळापुरता असतो आणि त्यानंतर तो संपलेला मानला जातो.

प्लेजर मॅरेजचे परिणाम

प्लेजर मॅरेज एक मोठा उद्योग बनला असला तरी, याच्या अनेक नैतिक, सामाजिक आणि कुटुंबीय परिणाम देखील होऊ शकतात. काही महिलांना हा व्यवसाय पैशांची कमाई करण्याचे एक साधन वाटत असला तरी, यामध्ये त्यांच्यावर होणारे दबाव आणि भावनिक ताण देखील असू शकतात. या प्रकारच्या विवाहांचे सामाजिक स्थान आणि परंपरांवर कसा परिणाम होईल, याबद्दल अनेक प्रश्न उभे राहतात. या शिवाय हा एक प्रकारचा वेश्या व्यवसायच असून महिलांचं त्यात शारीरिक शोषण केलं जातं.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.