कशी? खनकण कानाखाली मारली…! हे महान पत्रकार पाकिस्तान मधले
पत्रकाराचा व्हिडीओ असेल तर सगळ्यांना चांद नवाब आठवल्याशिवाय राहत नाही. आठवतोय ना तो पत्रकाराचा व्हिडीओ? प्रचंड व्हायरल झाला होता.
पाकिस्तानातून बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात जर तो पत्रकाराचा व्हिडीओ असेल तर सगळ्यांना चांद नवाब आठवल्याशिवाय राहत नाही. आठवतोय ना तो पत्रकाराचा व्हिडीओ? प्रचंड व्हायरल झाला होता. पत्रकारांचे पाकिस्तानातूनच काय सगळीकडूनच खूप व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी ते मुलाखत घेताना असतात तर कधी लाईव्ह शो करताना. एकदा तर एक पत्रकार बोलत असताना मागे अपघात सुद्धा झालेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. चालायचंच! माणूस आहे, इतर माणसाच्या आयुष्यात जशा घटना घडतात तशाच त्याच्या सुद्धा आयुष्यात घडणार. नाही का? हा आता कधी कधी या घटना काम करत असताना कॅमेरा मध्ये सर्रास दिसून येतात आणि व्हायरल होतात तो भाग वेगळा! असाच एक व्हिडीओ आहे, तुम्हीच बघा…
व्हिडीओ
reporter of the year! pic.twitter.com/F65BM0RsQr
— ViralPosts (@ViralPosts5) September 30, 2022
यावेळी चांद नवाब नाही, तर पाकिस्तानातील आणखी एका पत्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्कीच हसू येईल.
या व्हिडीओमध्ये रिपोर्टिंग करताना पत्रकार एका मुलाला कानाखाली मारतो. हे इतकं अचानक होतं की आपल्याला सुद्धा हसू आवरत नाही. यात या मुलाची सुद्धा चूक आहे बरं का !
आता माणूस जर रिपोर्टींग करतोय तर कशाला ना मध्ये मध्ये करावं? पण कारण काहीही असो, हिंसेला प्रोत्साहन देणं योग्य नाही. पत्रकार सुद्धा त्याच्यावर हात उगारतो.व्हिडीओ मध्ये मुलगा लहान दिसतोय.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, पत्रकार हातात चॅनलचा माइक घेऊन रिपोर्टिंग करत आहे आणि त्याच्या शेजारी एक मुलगा उभा आहे, तसेच मागे एक कार्यक्रम सुरु आहे.
दरम्यान, एक मुलगा मध्येच कॅमेऱ्यात डोकावू लागते. मग काय, पत्रकार भडकतो आणि बातमी देताना मुलाला जोरदार कानाखाली मारतो. हे करून तो पुन्हा पटकन आपली रिपोर्टींग सुरु करतो.
हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ViralPosts5 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आलाय. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘रिपोर्टर ऑफ द इयर!’.