एक वृद्ध जोडपं जेव्हा पावसाचं आनंद घेतं…! आनंद महिंद्रा यांना आवडलेला व्हिडीओ
आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले आणि किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी डब केलेले हे गाणे, ज्यात अमिताभ आणि मौसमी मुंबईच्या पावसाचा आनंद घेत होते. ते गाणे आजही सर्वांच्या हृदयाच्या जवळ आहे. हे गाणं आजही क्लासिक आहे. पाऊस पडत असला की लोक आजही हे गाणं लोकं आवर्जून ऐकतात.
मुंबई: पावसाळा आला की आपल्याला भजी आठवतात, चहा आठवतो आणि पावसाळ्याची गाणी आठवतात. अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी स्टारर ‘मंजिल’ या हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कामगिरी केली होती. मात्र १९७९ मध्ये आलेला हा चित्रपट आजही ‘रिमझिम गिरे सावन’ या गाण्यासाठी स्मरणात आहे. आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले आणि किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी डब केलेले हे गाणे, ज्यात अमिताभ आणि मौसमी मुंबईच्या पावसाचा आनंद घेत होते. ते गाणे आजही सर्वांच्या हृदयाच्या जवळ आहे. हे गाणं आजही क्लासिक आहे. पाऊस पडत असला की लोक आजही हे गाणं लोकं आवर्जून ऐकतात.
सोशल मीडियावर व्हायरल
मुंबईत पावसाचा आनंद लुटताना एका वृद्ध जोडप्याने काही पावले पुढे जाऊन हे गाणे रिक्रिएट केले आहे. या व्हिडिओमध्ये हे कपल मुंबईतील त्याच लोकेशन्सवर लोकप्रिय गाणे रिक्रिएट करताना दिसत आहे जिथे अमिताभ आणि मौसमी यांनी गाण्याचे विविध सीन्स शूट केले होते. शिवाय हे कपल देखील कलाकारांसारखेच आउटफिट परिधान करताना दिसत आहे. कलाकारांचे हावभाव सुद्धा अगदी तसेच आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्यासह नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे.
This is justifiably going viral. An elderly couple re-enact the popular song ‘Rimjhim gire sawan’ at the very same locations in Mumbai as in the original film. I applaud them. They’re telling us that if you unleash your imagination, you can make life as beautiful as you want it… pic.twitter.com/wO7iJ3da3m
— anand mahindra (@anandmahindra) July 2, 2023
‘रिमझिम गिरे सावन’
महिंद्रा यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा व्हिडीओ एकदम व्हायरल होत आहे. एका वृद्ध जोडप्याने मूळ चित्रपटाप्रमाणेच मुंबईतील त्याच ठिकाणी ‘रिमझिम गिरे सावन’ या लोकप्रिय गाण्याची पुनरावृत्ती केली. मी त्यांचे कौतुक करतो. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी सदाबहार गाण्यावरील जिवंत परफॉर्मन्ससाठी वृद्ध जोडप्यावर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला. क्लासिक गाण्यावर परफॉर्म केल्यानंतर हे वृद्ध जोडपे सोशल मीडिया स्टार बनले.