रिमझिम गिरे सावन गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या कपलने अमिताभ बच्चन यांच्याकडून व्यक्ती केली ‘ही’ अपेक्षा
शैलेश यांचं वय 51 तर वंदना यांचं वय 47 आहे. आधी या गाण्याचा ते केवळ एकच सीन शूट करणार होते पण नंतर ते इतकं सुंदर झालं की त्यांनी सगळंच गाणं रिक्रिएट करायचा निर्णय घेतला. सध्या हे मुंबईतलं जोडपं या गाण्यामुळे प्रचंड व्हायरल होतंय.
मुंबई: पावसाळा सुरु झालाय. पाऊस म्हणलं की आपल्याला आठवतो ते चहा, भजी आणि छान बॉलिवूडची गाणी. खरंतर पावसाळा, प्रेम आणि बॉलिवूडचं एक अनोखं नातं आहे. प्रत्येकजण या पावसाला प्रेमाशी जोडू पाहतो. या ऋतूत आपली ठरलेली अशी गाण्यांची एक प्ले लिस्ट सुद्धा असते. ते जुनं गाणं आठवतं का ज्यात अमिताभ बच्चन आहे? रिमझिम गिरे सावन? होय हेच गाणं चांगलंच व्हायरल झालंय. आता तुम्ही म्हणाल का? एका जोडप्याने हा व्हिडीओ रिक्रिएट केलाय. आजकाल रिक्रिएट करायचा जमाना आहे. कुठलंही जुनं गाणं लोकं छान पद्धतीने रिक्रिएट करतात. या जोडप्याने हे गाणं आणि रिक्रिएट केलं आणि ते इतकं सुंदर झालंय की ते सध्या ते प्रचंड प्रमाणात व्हायरल झालंय.
अमिताभ आणि मौसमी चं हे गाणं या जोडप्याने रिक्रिएट केलंय. या जोडप्याने सेम टू सेम असेच सीन्स शूट केले आहेत. हा सगळं व्हिडीओ मुंबईतल्या वेगवेगळ्या पण त्याच ठिकाणी जिथे हे गाणं शूट करण्यात आलं होतं तिथे शूट केलं गेलंय. त्यांचे हावभाव, ट्यान्कगे कपडे अगदी तसेच आहेत. या कपलने खूप सुंदर अभिनय केलाय. बरं आता जेव्हा फेमस झाल्यावर त्यांना विचारलं जातंय त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की व्हायरल होणं काय हे त्यांना माहीतच नाही. व्हिडीओ वर खूप लोकांनी कमेंट करणं काय असतं याचीही त्यांना कल्पना नाही.
This is justifiably going viral. An elderly couple re-enact the popular song ‘Rimjhim gire sawan’ at the very same locations in Mumbai as in the original film. I applaud them. They’re telling us that if you unleash your imagination, you can make life as beautiful as you want it… pic.twitter.com/wO7iJ3da3m
— anand mahindra (@anandmahindra) July 2, 2023
ठाण्यात राहणारे शैलेश इनामदार आणि वंदना इनामदार व्हायरल झालेल्या व्हिडीओ नंतर एक इच्छा व्यक्त करतात. त्यात ते सांगतात की, ” मला परदेशातून मित्रांचे,कुटुंबातील लोकांचे सगळ्यांचे फोन आले. आता माझी इच्छा आहे की आमच्या या व्हिडीओवर अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया द्यावी. शैलेश यांचं वय 51 तर वंदना यांचं वय 47 आहे. आधी या गाण्याचा ते केवळ एकच सीन शूट करणार होते पण नंतर ते इतकं सुंदर झालं की त्यांनी सगळंच गाणं रिक्रिएट करायचा निर्णय घेतला. सध्या हे मुंबईतलं जोडपं या गाण्यामुळे प्रचंड व्हायरल होतंय. अमिताभ बच्चन यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया द्यावी अशी इच्छाही ते आता व्यक्त करून दाखवतात.