Road Hypnosis: रोड हिप्नोसिस म्हणजे काय? त्यामुळे अपघात कसा होतो? विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर व्हायरल होणारा मेसेज…

या अपघातावरून सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल करण्यात आले ज्यात अपघाताची कारणं सांगण्यात आलीत. त्यातलाच एक खूप महत्त्वाचा मेसेज जो आपल्याला रोड हिप्नोसिस बद्दल सांगतो, त्याबद्दल माहिती देतो. रोड हिप्नोसिस म्हणजे काय?

Road Hypnosis: रोड हिप्नोसिस म्हणजे काय? त्यामुळे अपघात कसा होतो? विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर व्हायरल होणारा मेसेज...
Road HypnosisImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 3:39 PM

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, मराठा समाजासाच्या आरक्षणासाठी लढणारे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा काल मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याचं सांगितलं गेलं. गाडीवरील ताबा सुटला आणि अपघातात विनायक मेटेंच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागला त्यामुळे त्यांचं जागीच निधन झालं. अपघातातील निधन बऱ्याच गोष्टींकडे लक्ष वेधतं. अपघात झाला की घडवून आणला गेला असाही त्यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न आहे. या सगळ्याच्या उपर जर चालकाचा गाडीवरील (Car Driver) ताबा सुटल्यामुळे अपघात झालाय तर ते कसं झालं? ताबा कसा सुटला? अचानक गाडी चालवताना असं काय होऊ शकतं की ज्याने ताबा सुटून इतका मोठा अपघात घडू शकतो? या अपघातावरून सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल करण्यात आले ज्यात अपघाताची कारणं सांगण्यात आलीत. त्यातलाच एक खूप महत्त्वाचा मेसेज जो आपल्याला रोड हिप्नोसिस (Road Hypnosis) बद्दल सांगतो, त्याबद्दल माहिती देतो. रोड हिप्नोसिस म्हणजे काय? त्यामुळे अपघात कसा होतो? काय होतं नेमकं त्यात? बघुयात तोच व्हायरल होणारा मेसेज…

व्हायरल होणारा मेसेज…

रोड हिप्नोसिस म्हणजे काय?

मी स्वतः मागच्या 15 दिवसाखाली या स्थितीतुन गेलो आहे, दैव बलवत्तर म्हणून बचावलो संभाजीनगर-जालना मार्गावर हाच प्रत्येय आला. सिंदखेडराजा जवळ जेवण करून गाडी चालवत होतो AC फुल स्पीड वर चालू होती समोरच्या स्कारपीओ च्या मागे चालत असतांना नकळत नजर शुन्यात गेली आणि गाडीवरचा ताबा सुटला नशीब गाडीने line सोडली, पण पूर्णपणे रोड सोडला नाही, गाडी एक साईड थोडी आदळली आणि अचानक भानावर आलो..काय घडलं हे कस झालं आठवण्याचा प्रयत्न करत होतो पण टोलगेट पास केल्यानंतरच जे काही घडलं ते आठवण अत्यंत धूसर होतं. रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते. रोड हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर 2.5 तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही. रोड संमोहन हे तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे. रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो किती किमी वेगाने जात आहे, किंवा त्याच्या समोरच्या कारचा वेग, सहसा टक्कर 140 किमीच्या वर असते याचे विश्लेषण करू शकत नाही.

रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण कसं करणार?

रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्या सारखे वाटून नुसते बघत रहातो. वाहन चालवताना काही ठिकाणे आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. रोड संमोहन रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास, परिस्थिती खूप गंभीर होते. चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर 2.5 तासांनी 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे. डोळे उघडे असले तरी जर का मन बंद असेल तर अपघात अटळ आहे. गाडी चालवता चावलता ब्ल्यांक होणे थांबवा, क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन इकडे तिकडे बघत परत उत्साहात सुरू करा.

व्हायरल पोस्ट…

तुमचे आणि तुमच्या सहचाऱ्यांचे जिवन अनमोल आहे थोड्या निष्काळजीपणामुळे धोक्यात घालू नका

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.