चालत्या बाईकवर रोमान्स करणं कपलला पडलं महागात; पोलिसांकडून कारवाई
मिठीत बसली, किस केलं.... रस्त्यावर बाईक चालवत असताना रोमान्स करणं कपलला पडलं महागात; पोलिसांकडून कठोर कारवाई, काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल तर होतात पण वादाच्या भोवऱ्यात सापडतात.
Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल तर होतात पण वादाच्या भोवऱ्यात सापडतात. छत्तीसगड मधील दुर्ग जिल्ह्यातून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक कपलला चालत्या गाडीवर रोमान्स करणं महागात पडलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कपलचा तपास सुरु केला. व्हिडीओच्या आधारावर पोलिसांनी तरुणी आणि तरुणाला अटक केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कपलला चालत्या गाडीवर रोमान्स करणं महागात पडलं असून दोघे देखील अडचणीत सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भिलाई टाउनशिपच्या रस्त्यांवर एक तरुण नंबर प्लेट नसलेल्या बाईकवर प्रेयसीसोबत फिरत होता. फिल्मी अंदाजात रस्त्यावर प्रियसीसोबत फिरणारा २७ वर्षीय तरुण जावेद याचं वैशाली नगर याठिकाणी फर्निचरचं दुकान आहे. जावेद याने तब्बल दीड लाख रुपयांची गाडी फक्त ९ हजार रुपयांमध्ये खरेदी केली होती.
गाडी चोरीची असल्यामुळे जावेद याच्याकडे कागदपत्रे देखील नव्हती. शिवाय त्याने बाईकवर असलेली नंबर प्लेट देखील काढून टाकली होती. २१ जानेवारी रोजी जावेद याचा प्रेयसीसोबत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये तरुण बाईक चालवत आहे तर, तरुणी बाईकच्या टाकीवर बसलेली दिसत आहे. शिवाय दोघे किस करताना दिसत आहे.
वाहतूक नियमांनुसार, तरुणीला तरुणाच्या मागे असलेल्या सीटवर बसायला हवं होतं. पण तरुणी बाईकच्या टाकीवर बसलेली दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र तरुण आणि तरुणीच्या व्हिडीओची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोघांना रविवारी रात्री ९ वाजता अटक केली. सध्या याप्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे आहे दुर्ग याठिकाणी घडलेल्या या घटनेवर पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.