80 लाख रुपये पगार घेणारी गर्लफ्रेन्ड माहीत आहे? तिचा बॉयफ्रेन्डही साधासुधा नाही, भारीच आहे!

कधी काळी स्टोरमध्ये काम करणारी जॉर्जिनाचे आयुष्य बदलले ते रोनाल्डो तिच्या आयुष्यात आल्यानंतर. तिचं घर म्हणजे एक महाल आहे, त्या घराची किंमत आहे 48 लाख रुपये. तर 55 कोटीच्या Yacht मधून ती प्रवास करते. त्याबरोबरच Bugatti, Rolls-Royces और ferrari सारख्या कारमधून ती फिरत असते.

80 लाख रुपये पगार घेणारी गर्लफ्रेन्ड माहीत आहे? तिचा बॉयफ्रेन्डही साधासुधा नाही, भारीच आहे!
फुटबॉलपटू रोनाल्डो आपल्या गर्लफ्रेंडला 80 लाख देतो पगारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 7:41 PM

नवी दिल्ली: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) म्हणजे जगातील मोजक्याच श्रीमंत लोकांमधील तो श्रीमंत खेळाडू आहे. तो त्याच्या खेळासाठी प्रसिद्ध आहेच, मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील विविध घटनांमुळेही तो चर्चेत राहणारा खेळाडू आहे. यावेळी मात्र तो आपल्या गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिगेजमुळे (Georgina Rodriguez) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोनाल्डो आपल्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) खर्चासाठी दर महिन्याला 80 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देतात. ब्रिटिश माध्यमांनी तो आपल्या गर्लफ्रेंडला देत असलेल्या पैशाला पगार असं संबोधले आहे.

EI Nacional च्या अहवालानुसार असे सांगितले जाते की, रोनाल्डो आपल्या गर्लफ्रेंडला 83,000 पौंड इतकी रक्कम म्हणून देतो, ही रक्कम देतो कारण ती मुलांचा देखभाल आणि इतर खर्च ती स्वतः करते. 83, 000 पौंड म्हणेजच 82 लाख रुपयांपेक्षा अधिक देतो. रोनाल्डो असो की, जॉर्जिया ही दोघंही लग्जरी लाईफस्टाइल जगतात. ही दोघंही आपल्या आयुष्यात कसं जगतात हे पाहायचं असेल तर जॉर्जियाच्या सोशल मीडियाचं अकाऊंटन कळते.

फॅन्स फॉलोवर्स हे 36 मिलियनपेक्षा अधिक

जॉर्जिया ही एक प्रतितयश मॉडेल आहे, अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये ती झळकली आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असल्याने तिथे तिचे फॅन्स फॉलोवर्स हे 36 मिलियनपेक्षा अधिक आहे. जॉर्जिनाच्या एका एका फोटोवर लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळतात.नुकताच तिच्या आयुष्यावर बनवलेला माहितीपट I Am Georgina मध्ये तिच्या आयुष्यातील अनेक पैलू दाखवण्यात आले आहेत.

रोनाल्डोमुळे आयुष्य बदललं:

‘द मिरर’च्या अहवालानुसार कधी काळी स्टोरमध्ये काम करणारी जॉर्जिनाचे आयुष्य बदलले ते रोनाल्डो तिच्या आयुष्यात आल्यानंतर. तिचं घर म्हणजे एक महाल आहे, त्या घराची किंमत आहे 48 लाख रुपये. तर 55 कोटीच्या Yacht मधून ती प्रवास करते. त्याबरोबरच Bugatti, Rolls-Royces और ferrari सारख्या कारमधून ती फिरत असते.

जॉर्जिनाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन समजते की तिचं लाईपस्टाईल काय आहे. ती जरी मुलांचा सांभाळ करत असली तरी, तिचं सोशल मीडियावर  अ‍ॅक्टिव्ह असणं म्हणजे तिच्या फॅन्स फॉलोवर्सला आनंदाचं उधान आलेलं असतं. तिच्या एका एका फोटोला लाखोंच्या लाईक्स आणि कमेंटस मिळत असतात.

संबंधित बातम्या

‘पिछे देखो पिछे, पिछे तो देखो’ फारुख अब्दुल्लांच्या भाषणावेळी मागे नेमकं काय चाललंय?

VIDEO : मॅच हरल्यानंतर टेनिसपटूने जिंकलेल्या खेळाडूच्या कानाखाली काढला जाळ, पाहा व्हिडीओमध्ये नेमके काय घडले!

VIDEO : बाईक रेसमधील हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, जिद्द कशाला म्हणतात, पाहा या व्हिडीओमधूनच!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.